युपीएसीमध्ये सचिन बिसेनचे यश

    दिनांक :26-Apr-2025
Total Views |
आमगाव, 
Sachin Bisen's सालेकसा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातून सचिन गुणवंत बिसेन याने युपीएससी परीक्षा सर करून यश प्राप्त केले आहे. सचिनला 688 वी रँक मिळाली आहे. सामाजिक कार्यकर्ते रितेश अग्रवाल, गणेश भदाडे यांनी सचिनची भेट घेत त्याचा सत्कार केला.
 

sdfsdfg  
 
सचिनचे यश म्हणजे जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांनी लिहिलेली प्रेरणादायी कहाणी आहे. ग्रामीण आणि साधनसंपत्तीच्या मर्यादित परिस्थितीत वाढलेल्या सचिनने आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर सर्वोच्च शासकीय सेवा परीक्षा सर केली. त्याचे यश केवळ वैयक्तिक प्रगती नसून, गोंदिया जिल्ह्यातील युवकांच्या प्रेरणेचे दीपस्तंभ ठरले आहे. असे मत रितेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.Sachin Bisen's सचिनच्या यशामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
कठीण परिस्थिती म्हणजे संधी असते. युपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि स्वप्नांवर विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातून आलो असलो तरी माझी ध्येयप्रेरणा कधी कमी झाली नाही. माझ्या यशाचे खरे श्रेय माझ्या आई-वडिलांच्या त्यागाला, गुरूजनांच्या मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या मेहनतीला जाते. माझ्या तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रत्येक तरुणाने ठाम निश्चय व प्रामाणिक प्रयत्न केल्यास कुठलेही स्वप्न अशक्य नसल्याचे सचिनने सांगीतले