नोएडा :
Seema Haider केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर, पाकिस्तानहून बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. "मी पाकिस्तानची मुलगी होते, पण आता भारताची सून आहे," असे तिने भावनिक आवाहन केले आहे.
सीमा Seema Haider हैदर दोन वर्षांपूर्वी चार मुलांसह भारतात दाखल झाली होती. सध्या ती गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील राबुपुरा भागात सचिन मीना या युवकासोबत राहत आहे. सीमाने सांगितले की, तिने सचिनशी विवाह केल्यानंतर हिंदू धर्म स्वीकारला आहे.
इंस्टाग्रामवरून भावनिक संदेश
शुक्रवारी Seema Haider संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत सीमाने आपली भावना व्यक्त केली. व्हिडिओत एक व्यक्ती तिला विचारते की तिला काय सांगायचे आहे. त्यावर सीमा म्हणाली, "मला पाकिस्तानला जायचे नाहीये सर." तसेच ती पुढे म्हणाली, "मी मोदीजी आणि योगीजी यांना आवाहन करते की मी त्यांच्या आश्रयात आहे, त्यांच्या विश्वासावर खरी उतरले आहे. मी पूर्वी पाकिस्तानची मुलगी होते, पण आता भारताची सून आहे. कृपया मला इथेच राहू द्या." विशेष म्हणजे, १८ मार्च २०२५ रोजी सीमाने एका मुलीला जन्म दिला आहे.
सीमा हैदरचा भारतात येण्याचा प्रवास
सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जेकबाबाद येथील रहिवासी आहे. मे २०२३ मध्ये तिने कराचीमधील आपले घर सोडले आणि नेपाळमार्गे भारतात आली. भारतात येऊन ती गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात २७ वर्षीय सचिन मीना याच्यासोबत राहत होती. या प्रकरणाची माहिती जुलै २०२३ मध्ये समोर आली, तेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी सीमाला अटक केली होती.
सीमा आणि Seema Haider सचिन यांची ओळख २०१९ साली एका ऑनलाइन गेम खेळताना झाली होती. सीमाला तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरपासून चार अपत्ये आहेत. गुलाम हैदरने आपल्या मुलांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय वकिलाची मदत घेतली होती. सीमावर बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, तर सचिनवर बेकायदेशीर स्थलांतरिताला मदत केल्याचा आरोप आहे. सध्या ते दोघेही जामिनावर मुक्त आहेत.