तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग

26 Apr 2025 11:06:28
तुमसर,
Tumsar Panchayat Samiti's आज सकाळच्या ८ सुमारास तुमसर येथील पंचायत समितीच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत अनेक महत्त्वाचे दस्तावेज आणि फाईल्स जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग अपघाताने लागली की कोणी हेतुपुरस्सर लावली, याबाबत प्रशासन व पोलिस तपास करत आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून ही घटना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
 

Tumsar Panchayat Samiti 
 
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Tumsar Panchayat Samiti's मात्र, महत्वाच्या शासकीय कागदपत्रांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, तपासानंतरच आग कशी लागली याबाबत स्पष्टता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0