दीपक शेंडेकर यांना आरोग्य रक्षक अवार्ड

    दिनांक :27-Apr-2025
Total Views |
नागपूर
Madhavbagh Amravati Road Nagpur माधवबाग हृदय रोगांवर उपचार करणारी एक विश्वसनीय संस्था म्हणून‌ स्थापित आहे. अमरावती रोड पर कोंढाळी स्थित माधवबाग परिसरात स्वास्थ्य परिवार उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांना आरोग्य रक्षक अवार्ड देवून सम्मानित करण्यात आले. याप्रसंगी भैय्याजी ठवकर, दयाराम धनगरे, वर्षा मिलमिले, संगीता मालवणकर, गणपति पथे,‌ संतोष साबळे, अरविंद परदेशी, विनोद बंडेवार, प्रमोद तोंडरे कृष्णकुमार डोबले, जनकलाल लिहारे, गोवर्धन खंडारे, तुलसीदास यादव व पंढरी शेरके यांनाही सम्मानित करण्यात आले.
 
 
 

shende
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. गौरव शेळके होते. विशेष अतिथि म्हणून‌ माधवबाग मध्ये स्वास्थ्य लाभ घेत असलेल्या देवीका हिंगे, प्रमोद हिंगे, संभाजी ‌गोन्नाडे आणि विठ्ठल धोटे उपस्थित होते.Madhavbagh Amravati Road Nagpur  त्यांनी आपले अनुभव कथन केले. डाॅ. किर्ती सावरकर व किरण तागडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आरती चरडेआणि आभारप्रदर्शन स्वाती खंते यांनी केले. कार्यक्रमाला दीपक नक्षणे, अजय जिरापुरे, वैशाली फुलझेले, मिनाक्षी मानमोडे, अंजना जिरापुरे, बेबी बोंद्रे, ऋतिका गोतमारे, सोनाली धांडे, शिल्पा, अमित नारनवरे, सुनिल कोहळे आदि मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र