नागपूर,
Nagpur-Kolhapur flight service नागपूर आणि कोल्हापूर हवाई मार्गावर लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. स्टार एअरलाइन्सकडून १५ मेपासून नागपूर-कोल्हापूर-नागपुर विमान सेवा सुुरू करीत असल्याचे सांगितले आहे. या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकॉनॉमी क्लासच्या असतील. विमान आठवडयातून ५ दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाण घेईल. प्रवाशांना येथून केवळ १० मिनिटांत कोल्हापूरला पोहोचता येईल. या विमान सेवेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाार्या नागपूर ते कोल्हापूर विमानसेवेला सुरुवात होणार असल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केल्या जात आहे. Nagpur-Kolhapur flight service नागपूरहून सकाळी १० वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी ११.३० वाजता कोल्हापुरात येईल. दुपारी बारा वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता हे विमान नागपूरमध्ये पोहोचेल. या विमानात बारा बिझनेस क्लास आणि ६४ इकाँनॉमी क्लास आसने असतील.