सकल हिंदु समाजाची पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली

कॅन्डल मार्चने वेधले लक्ष

    दिनांक :28-Apr-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
Pahalgam attack जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी निरपराध हिंदू नागरिकांना धर्म विचारून त्यांची निर्गुण हत्या केली, ह्या दुर्दैवी घटनेचे पडसाद देशभर उमटले त्याचाच एक भाग म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगरूळनाथ शहरामध्ये भव्य कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला शेकडोच्या संख्येने युवा वर्ग, पुरुषवर्ग, व्यापारी बंधूसह ग्रामीण भागातील सकल हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
 
 
७
 
भारत माता की जय, वंदे मातरम्, कश्मीर किसका हमारा, जहा हुए बलिदान वो कश्मीर हमारा है अशा जयघोषांनी नाथनगरी दुमदुमली. सुभाष चौक येथे सायकाळी ७.३० वाजता माजी सैनिकांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या कॅन्डल मार्चने प्रस्थान केले. Pahalgam attack छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,शहीद भगतसिंग चौक मार्गे वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे हल्ल्यात शहीद झालेल्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून सामुहिक वंदे मातरम चे गायन करण्यात आले व समारोप करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे संचालन सतीश हिवरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मुंढरे, प्रा. प्रशांत तळेकर, गणेश ढगे, दिनेश वाघ, मयूर ठाकरे, संतोष आवटे, ललित जोगे, विकास चौधरी, श्रीपाद दिक्षीत, स्वप्निल निलटकर, गजानन हिवरकर, Pahalgam attack वैभव राऊत, मंगेश सोळंके, कृष्णा गर्दे आदींनी अथक परिश्रम घेतले.