नागपूर,
Dharampeth-Nagpur धरमपेठ माध्यमिक शाळेत संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी जीवन कौशल्य, वाहतुकीचे नियम, विविध शारीरिक स्वास्थ्य वाढविणारे खेळ, कथा कथन, क्राफ्ट, चित्रकला, श्लोक, देश भक्ती गीतं यावर शिबिर घेण्यात आले. शिबिरादरम्यान विविध स्पर्धा घेतल्या. विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलीत. शिबिर यशस्वी करण्यासाठी शर्मिला चौरसिया, मनीषा फिरके, संस्कृति भेलोंडे, प्राजक्ता यांचे प्रशिक्षक म्हणून सहकार्य लाभले. शिबिरा दरम्यान मुलांना खाऊ वाटप करण्यात एकुण ८७ विद्यार्थीनी शिबिराचा लाभ घेतला. प्रकल्प निदेशक भारती सराफ, नवजीवन व्यसन मुक्ति केंद्र, आदिम जाती सेवक संघ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका स्वाती अवधूत व त्यांच्या पूर्ण शिक्षिका व कर्मचारी वर्गाचे सहकार्य शिबिराला लाभले.

भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम शाखे तर्फे घुसे राष्ट्रीय संस्कार सह संयोजक, अध्यक्ष प्रांत धानोरकर, कोषाध्यक्ष विदर्भ प्रांत दिलीप गुळकरी, Dharampeth-Nagpur उपाध्यक्ष सेवा वसंत काकडे, विदर्भ प्रांत सुप्रिया ग्राम विकास विदर्भ प्रांत, कोषाध्यक्ष दक्षिण पश्चिम मिलन काळे, अध्यक्ष दक्षिण पश्चिम शुभांगी काकडे, संपर्क प्रमुख वैजयंती दीक्षित, सेवा प्रमुख मधुवंती जोशी, संघटन प्रमुख किशोर बेलुरकर उपस्थित होते
सौजन्य: शर्मिला चौरसिया, संपर्क मित्र