दुचाकीला कारची धडक; एक गंभीर

29 Apr 2025 20:31:10
गोंदिया, 
Accident News : पुढील वाहनाला ओव्हरट्रॅक करण्याच्या नादात कार व दुचाकीची आपसात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल परिसरात घडली. कृष्णकुमार पटले रा. कुणबीटोला (कलपाथरी) ता. गोरेगाव असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे.
 
 
gond
 
कृष्णकुमार हा डव्वाकडून दुचाकी क्रमांक एमएच 35 एव्ही 1671 ने स्वगावी जात होता. यावेळी मुरदोली जंगल शिवारात पुढील वाहनाला ओव्हरट्रॅक करीत असताना विरूद्ध दिशेने येणार्‍या कार क्रमांक एमएच 28 बी क्यू 2723 या कारची धडक बसली. धडक बसताच दुचाकास्वार रस्त्याच्या कडेवर पडून त्याचा उजवा हात व पायाला गंभीर दुखापत झाली. तर कारही रस्त्याच्या शेजारी खड्ड्यात जाऊन कारचेही नुकसान झाले. बातमी लिहेपर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
Powered By Sangraha 9.0