त्याने तीन वेळा 'अल्लाह हू अकबर' म्हटले आणि गोळीबार झाला सुरु...पहलगाम लाईव्ह video

29 Apr 2025 11:36:28
नवी दिल्ली:
Pahalgam live video 'मला त्याच्यावर १००% संशय आहे... मी झिपलाइनवर गेलो आणि त्याने तीन वेळा "अल्लाह हू अकबर, अल्लाह हू अकबर, अल्लाह हू अकबर" असे म्हटले आणि दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. हे वक्तव्य आहे पर्यटक ऋषी भट्ट यांचे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो तपास यंत्रणांना दहशतवाद्यांबद्दलचे संकेत देऊ शकतो. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झिपलाइनचा आनंद घेत असलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडिओ टिपला आहे. या व्हिडिओमध्ये, झिपलायनिंग करणारा पर्यटक ऋषी भट्टने त्या दिवसाची संपूर्ण कहाणी शेअर केली आहे. ऋषी भट्ट म्हणतात की, त्यांना झिपलाइनवरील व्यक्तीवर संशय आहे, त्यांना दहशतवाद्यांबद्दल काहीतरी माहिती असू शकते.
 
हेही वाचा: भारतने आता पाकिस्तानशी व्यापारी संबंधही तोडले! 
 

Pahalgam live video 
 
 
ऋषी भट्ट यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'झिपलाइन करणाऱ्या व्यक्तीवर मला १००% शंका आहे कारण माझ्या आधी ९ लोक झिपलाइन करत होते. त्याने या लोकांना आरामात झिपलाइनवर जाऊ दिले मात्र मी झिपलाइनवर येताच त्या माणसाने तीन वेळा "अल्लाह-हू अकबर" म्हटले आणि त्यानंतरच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा मला ते कळले नाही, पण २३ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर, जेव्हा मी अहमदाबादला पोहोचलो, तेव्हा मी संध्याकाळी माझ्या संपूर्ण कुटुंबासह बसून व्हिडिओ पाहत होतो. मग माझ्या लक्षात आले की झिपलाइन करणाऱ्या व्यक्तीने काय केले होते.
 
 
 
 
झिपलाइनवरील त्याच्या वेळेची आठवण करून देताना ऋषी भट्ट म्हणाले, 'व्हिडिओमध्ये, मी पाहिले की झिपलाइनवरील व्यक्ती सुरुवातीला म्हणत होती, मिनी स्वित्झर्लंड, मिनी स्वित्झर्लंड, पण त्याने मला झिपलाइनवर पुढे पाठवताच, त्याने तीन वेळा अल्लाहू अकबर मी म्हटले. यामुळे मला त्याच्याबद्दल संशय येत आहे. मला शंका आहे की तो माणूस यात सामील असावा किंवा त्याला हल्ल्याबद्दल काहीतरी माहिती असावी. दरम्यान ऋषी भट्ट दुपारी त्यांच्या कुटुंबासह पहलगामला पोहोचले. या काळात त्याने व्हिडिओ बनवले. Pahalgam live video काही फोटो काढले. तोपर्यंत तिथलं वातावरण ठीक होतं. यानंतर त्याने झिपलाइनचे तिकीट काढले. तो म्हणाला की आमच्या आधी तीन लोकांचे कुटुंब होते. त्यानंतर तीन जणांचे आणखी एक कुटुंब होते. त्यानंतर, आम्ही तिथे होतो. माझी पत्नी आणि मुलगाही खाली पोहोचले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्या समोर काही लोकांना गोळ्या घातल्या होत्या. असे सांगितले जात आहे की ज्या व्यक्तीने झिपलाइन केली त्याला एनआयएने चौकशीसाठी बोलावले आहे.
Powered By Sangraha 9.0