अन् लग्न मंडपातच वधूपित्याचे गेले प्राण!

29 Apr 2025 18:47:07
तुमसर,
bride's father Death शूभ मंगल झाले होते...कन्यादानही झाले. जेवणाच्या पंगती सुरु झाल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, अचानक आनंदाची जागा दूःख आणि निरव शांततेने घेतली. ज्या वधू पित्याने काही वेळाआधी आपल्या लेकीचे कन्यादान केले, त्या पित्याचा मंडपातच वृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. कल्पनाही न करविला जाणारा हा प्रसंग आज २९ रोजी रोजी तुमसर तालुक्यातील झारला गावात घडला अन् अख्ख गाव हळहळल!
 

brids 
 
कधीही कूणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रसंग खरवडे कुटूंबियांच्या नशिबी आला. तालुक्यातील झारली गावातील गणेश मयराव खरवडे यांची पल्लवी हिचा विवाह भंडारा येथील आकाश मंदूरकर या युवका सोबत निश्चित झाला होता. तिथी नुसार आज २९ रोजी दुपारी १२ वाजता विधीवत हा सोहळा वधू पित्याच्या घरी झारली येथे पार पडला. मंगलाष्टके झाली. वडीलांनी मुलीचे कन्यादान केले. एकीकडे जेवनाच्या पंगती उठत होत्या. अवघ्या काही वेळाने मुलीची पाठवणी करावयाची असल्याने, ती तयारी सुरु असतानाच अचानक दुपारी २ वाजताच्या सुमारास खरवडे यांना छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या आणि ते मंडपात कोसळले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.bride's father Death
वधू पित्याची वार्ता लग्न मंडपात पोहचली आणि आनंदाचे वातावरण दूःखात बदलून गेले. ज्या मुलीची पाठवणी केली जाणार होती, तिच्या पाठवणी ऐवजी वडीलांच्या अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराला समोरे जाण्याची वेळ नववधूवर आली. खरवडे कुटूंबियांवर ओढविलेला हा आघात अकल्पीत होताच, मात्र या प्रसंगाने मंडपातील प्रत्येकाच्या डोळयात अश्रु तराळताना दिसले. या घटनेनी अख्या गावाला हळहळायला भाग पाडले.
Powered By Sangraha 9.0