अवकाळी पावसाने रब्बी ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान, जनावरे दगावली!

03 Apr 2025 20:20:07
बुलढाणा, 
 
Buldhana-rain-farmers touble अचानक आलेल्या अवकाळी विजेच्या कडकडाटात पावसाने बुलढाणा तालुक्यातील गावांत बुधवारी रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली या पावसाने कांदा, रब्बी ज्वारी, मका, आंबा, पपई, केळी, लिंबू, संत्रा, फळबाग व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
 
 

Buldhana-rain-farmers touble  
 
 
वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. Buldhana-rain-farmers touble  दरम्यान,  वीज पडून विविध ठिकाणी पाच जनावरे दगावली असून तालुक्यातील गावात एका घराची पडझड झालेली आहे. तसेच, ६.१मी मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी विभागीय आयुक्त यांना लेखी अहवाल पाठविला आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजता चिखली तालुक्यातील गावात पावसाने हजेरी लावली.
Powered By Sangraha 9.0