वर्धा,
Guardian Minister Dr. Bhoyar भविष्यातील संकटाची चाहूल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाणी नियोजना संदर्भात ठोस पाऊले उचलली आहे. तथापि, त्यांच्या पुढाकारामुळे राज्यातील जल नियोजनात क्रांतिकारी बदल होणार आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी देखील शेतकर्यांना पाणी मिळणार आहे. यासाठी सिंचन विभागाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण राहणार असल्याने आपल्या अखत्यारितील प्रकल्प वेळीच पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने १५ ते ३० एप्रिलपर्यंत आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी ते आज ३० रोजी बोलत होते. Guardian Minister Dr. Bhoyar यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल फरकाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार गुप्ता, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेश शर्मा, निम्न वर्धा कालवे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रवीशंकर हरिणखेडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, येणार्या काळात जल व्यवस्थापनाचा विषय जगासमोर एक मोठी समस्या म्हणून उभा राहणार आहे. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, अशी नेहमी चर्चा होते. भविष्यातील संकट ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहे. Guardian Minister Dr. Bhoyar मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृषण विखे पाटील, गिरीष महाजन यांनी त्या दिशेने कार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुत शिवार योजना राज्यात प्रभावीपणे राबविली होती. या योजनमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच सिंचन क्षमता देखील वाढली होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे.
सोबतच जलसंधारणच्या माध्यमातून अनेक उपायायोजना आरंभ केल्या आहे. सिंचनाच्या योजना राबविताना अनेक अडचणी व संकटे येणार आहे. यावर आपल्याला मात करावी लागेल. सिंचनाच्या कार्यात पाणी वापर संस्थेचे सहकार्य घेण्याची गरज असल्याचे पालकमंत्री भोयर यांनी अधोरेखित केले. सिंचन संदर्भात जो प्रकल्प आपल्या भागात होत आहे. त्यांचे गांभीर्याने नियोजन करा. Guardian Minister Dr. Bhoyar स्वातंत्रयाच्या ७५ वर्षात देखील कारंजा व आर्वी तालुयातील १५ गावातील पशुपालकांना पाणी व चारा टंचाईमुळे गाव सोडून जावे लागते ही आपल्यासाठी चिंतनाची बाब आहे. पुढील पिढीचा विचार करून प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.