अवैध गौण खनिज वाहतूक: १ टिप्पर व २ ट्रटर जप्त

30 Apr 2025 21:30:47
आर्वी,
Illegal Minor Mineral Transport गौण खनिज वाहतूक करण्याकरिता परवानगी न घेता अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर ३० रोजी सकाळी आर्वी येथे कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ टिप्पर व २ ट्रटर जप्त करण्यात आले. अनधिकृत मुरूम वाहतूक करत असताना जगदीश नेवारे, वाहन चालक, मालक चेतन वानखेडे यांचा ट्रक आढळून आला. सदर वाहन चालका जवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
 
 
८
 
तसेच विरूळ येथे पहाटे तहसील कार्यालयाचे पथक गस्त करीत असतेवेळी अनधिकृत रेती वाहतूक अक्षय खडसे याच्या मालकीचा ट्रटर आढळून आला. वाहन चालका जवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रटर जप्त करून मंडळ अधिकारी कार्यालय विरूळ येथे जमा करण्यात आले आहे. Illegal Minor Mineral Transport आर्वी येथे २४ एप्रिल रोजी सकाळी तहसील कार्यालयाचे पथक गस्त करीत असतेवेळी अनधिकृत रेती वाहतूक रशीद शाहा यांचे मालकीचा ट्रटर आढळून आला. वाहन चालका जवळ कोणताही वाहतूक परवाना नसल्याने ट्रटर जप्त करून वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी वान्मथी सी., उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार हरीश काळे, नायब तहसिलदार साईकिरण आवुलवार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी मिलिंद पाठक, शुभांगी डेहनकर यांच्या पथकाने केलेली आहे
Powered By Sangraha 9.0