अक्षय तृतीया, परशुराम जयंतीनिमित्त पादत्राणे वाटप

नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
हिंगणघाट,
Parashuram Jayanti नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर आणि परशुराम जयंतीनिमित्ता गरजूंना पादत्राणे व दुपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील अनेक गरजू, वृद्ध, महिला आणि लहान मुलांना उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी चप्पल आणि दुपट्ट्याची गरज असते. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते आपल्या या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. अशा गरजूंना दिलासा देण्यासाठी नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक जलाराम मंदिर परिसरात दानशूर व्यतींच्या उपस्थितीत पादत्राणे व दुपट्ट्यांचे वितरण करण्यात आले.
 
 
८
 
या सेवाभावी उपक्रमात नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, कार्याध्यक्ष मनोज सिंघवी, उपाध्यक्ष ताराचंद सिंघवी, सचिव पराग मुडे, कोषाध्यक्ष विपिन खिवसरा, प्रा. किरण वैद्य, दुर्गाप्रसाद यादव सर, नेताजी लजूरकर, रूपचंद हेमनानी, डॉ. शरद मद्दलवार, सी.ए. श्याम करवा, अ‍ॅड. विशाल जैन, लक्ष्मण दहाके, अरुण पंडित, रामचंद्र खडगी, Parashuram Jayanti चंद्रकांत कामडी, संजय मनमोडे, चंद्रकांत रोहणकर, यशवंत गडवार, निलेश भुतडा, अमोल भुतडा, आदित्य भोला, सुरेंद्र पाढंरे, बाबाराव धाईत, महेश खडसे, प्रा. लतिका बेलेकर, शुभांगी वैद्य, अलका रानपारा, किरण अग्रवाल, भाग्यश्री खियानी, विजया पराते, कविता हेमनानी, बबीता जोशी आणि नारायण सेवा मित्र परिवाराचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.