वर्धेतील राम मंदिरात परशुराम जयंती साजरी

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Parshuram Jayanti Wardha गवान परशुराम जयंतीनिमित्त स्थानिक गोलबाजार येथील श्रीराम मंदिरात परशुराम जयंती कार्यक्रमाचे आयोजन २९ रोजी सायंकाळी करण्यात आले होते. संस्कार भारतीचे मार्गदर्शक माधव पंडीत, ज्येष्ठ उद्योजक श्रीनिवास लेले, श्रीराम मंदिराचे सचिव विजय धाबे, उद्योजक मंदार अभ्यंकर यांनी दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले.
 
 
०
 
शैलेश डेहाडराय यांनी श्रीपरशुराम चालीसाचे पठण केले. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे अध्यक्ष सतिश बावसे, कार्याध्यक्ष मकरंद उमाळकर, मधुकर जोशी, प्रकाश परसोडकर, राम वखरे, महेश देशपांडे, Parshuram Jayanti Wardha दीपक साने, अद्वैत पाच्छाव, अरुण वझे, मेघजित वझे, शुभांगी पाच्छाव, रुपाली अभ्यंकर, कीर्ती आपटे आदी उपस्थित होते. संचालन उद्धव भुसारी यांनी केले. यशस्वीतेसाठी भूषण अग्निहोत्री, विवेक श्रौती, अमोल जोशी, धनंजय बाराहाते यांनी परिश्रम घेतले.