वादळवारा व तुरळक पावसाचा इशारा

तापमान ४१.६ अंशांवर

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur Weather : ढगाळ वातावरणामुळे बुधवारी तापमानाचा पारा घसरला. तापमान ४१.६ अंशांवर सेल्सिअस नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा १.६ अंशांनी होते. तर मंगळवारी ४३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. शनिवारी सायंकाळी तुरळक पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाल्यानंतर रविवारी तामपान ३९.२ अंश सेल्सिअस होते. मात्र तीन दिवसात पुन्हा तापमान वाढले.
 
 
 
HJHJK
 
 
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार पाच दिवसपर्यंत हवामान असेच राहणार असून नागपुरात वादळवारा व तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात कमाल तापमान अकोला ४५.०अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बदललेल्या हवामानामुळे शहरवासीयांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाचा यलो अलर्ट देखील कायम आहे. मे महिन्यातील वाढते तापमान लक्षात घेवून प्रशासनाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ठोस उपाय योजना केली आहे. मनपाद्वारे शहरात दहा शासकीय रुग्णालयांत कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांनादेखील उष्माघाताच्या उपचारासंदर्भात व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.