कव्हर स्टोरी
- सना पंडित
women in Ramayana रामायण हे जनमानसात केवळ लोकप्रिय नाही, तर तो जगण्याचा मार्ग आहे. हजारो वर्षांपूर्वी घटित ही अलौकिक गाथा अनेक आयामांनी आपल्या जगाला समृद्ध करून जाते. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर रामायण काळातील अनेक व्यवहार, वर्तन व संदर्भ आजही स्पष्टपणे आढळतात. आदर्श मानवीय संस्कृती आणि मानवी जीवनाचा साद्यंत विचार जितका रामायण देतं, तितका कुठलाही ग्रंथ देत नाही.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही तत्वांना राजकारणापेक्षा महत्वपूर्ण भूमिका देऊन, लोकशाहीचे बीजारोपण करणारा राजा राम! या प्रवासात काही ऐतिहासिक दूरदर्शी नोंदी फारच प्रेरक आणि रामराज्य स्थापन करण्यात उत्प्रेरक ठरल्या. या नोंदी म्हणजे रामायणातील स्त्रिया!
(छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
women in Ramayana पहिली स्त्री म्हणजे राजा दशरथाची आई. महाराणी इंदूमती! दशरथाचा जीवन आलेख सोपा नव्हता. दहा दिशांना ज्यांचा रथ संचार करू शकत होता, लढून जिंकत होता, वंशवृद्धीसाठी त्याने एका पाठोपाठ एक असे तीन विवाह केले. पण संतती नाही. ते न झाल्यामुळे पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी आत्मिक बळ लागतं. ते आईकडूनच मिळतं. आईवडीलांची सेवा करणाèया बाळाला चुकीने मृत केल्यामुळे दशरथ शापित झाला. पुत्रवियोगाने मरण्याचा शाप दिला. त्या शापानेच दशरथाला पुत्रप्राप्तीचे आश्वासन मिळाले. त्यापूर्वी, दशरथ आणि कौसल्येला शांता नावाची मुलगी होती. बहिण वर्षिनी ही अंगराज रोमपदाची पत्नी होती. त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून मुलगी असूनही शांता दत्तक दिली होती. तेव्हा समाज समान तत्वावर होता. पुत्रकामेष्टीने तीन राण्यांना मिळून चार मुले झाली. कौसल्येचा राम, सुमित्रेस लक्ष्मण आणि शत्रुघ्न व कैकेयीस भरत. या तीनही राण्या प्रगत राज्यातून आलेल्या, शस्त्र-शास्त्र निपुण! त्यामुळे पुत्रकामेष्टी ऊर्जा आणि या विलक्षण गुणी राण्यांची ही संतती काही अंशी दिव्य असणारच होती.
women in Ramayana कौसल्या ही धर्मपरायण स्त्री होती. सुमित्रा पत्नी आणि सखी म्हणून दशरथाला सहचर होती. रणधुरंधर कैकेयी. तिने तर ईक्ष्वाकु वंशालाच जीवनदान दिलं. युद्धात दशरथाला हे संपूर्ण रामायणासाठी कारक होतं. कारण, दशरथ जीवंत राहिल्यामुळे राज्य आणि वंश सुरक्षित राहिले. कैकेयीने रामालासुद्धा राजकारण आणि युद्ध व्यवस्थापनेचे धडे दिले. राम हा उत्तम शिष्य होता. त्याच्या ज्ञानग्रहणाच्या कक्षा विस्तीर्ण होत्या. कैकेयी बहुज्ञ होती. नीडर, कणखर, विद्वान, सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध होती. दशरथाची ती प्रेयसी होती. पण राज्यशकटाचे वंगणही! हा सगळ्यांनाच प्रिय होता तसा तो कैकेयीला देखील प्रिय होता. कैकेयीला रामाच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक क्षमता ज्ञात होत्या. तिने त्या क्षमतांना ओळखून रामाला जनमानसात अढळस्थान मिळवून दिलं.एकूणच राम, लक्ष्मण, शत्रुघ्न व भरत ह्यांचेवर मातृसंस्कार बलाधिक्य होतं. सीता ही रावणाची कन्या असल्याचे अनेक संदर्भ आणि दाखले पुराणात आढळतात. रावण हा बलाढ्य राजा होता. त्याला वेद, पुराण आणि विद्या अवगत होत्या. त्याचे भूमी, जल, वायू ह्या तीनही मार्गांनी संचार आणि स्वामित्व होते. त्याच्या औषधी संशोधनातून उत्पन्न कन्या सीता हिच्या शारीरिक व मानसिक शक्ती व ऊर्जा, सर्वसामान्य मानवीय शक्तींपेक्षा पटीने जास्त होत्या. तिच्या विकासासाठी उष्ण कटिबंधीय वातावरण बाधक होते. त्याने हिमालयाची सावली पडणाऱ्या देशाच्या आपल्या मित्रास मिथीला नरेश जनकास सोपवली.
women in Ramayana मुळातच उत्तम गुणसूत्रसंपन्न सीता मिथीलेत ज्ञान आणि धर्म यांच्या शिक्षेने परिपूर्ण झाली. रामाला जे आदर्श राज्य निर्माण करायचे होते, त्यासाठी ज्या प्रापंचिक तडजोडी, सामायिक भूमिका, नाती, परंपरा, अधिकार, प्रतिष्ठा, जबाबदारी व कर्तव्य यांचा समन्वय साधणे, अपेक्षा सन्मान यांची आहुती देण्याची तयारी असावी लागते. हे सगळं सीतेठायी होतं. चौदा वर्षे अपरिचित प्रदेशात, त्या प्रवासात त्यांना अहल्या भेटली. ब्रह्मापुत्री अहल्या रूप, गुण सौंदर्याने ओतप्रोत होती. चीरयौवनेचं वरदान लाभलेल्या अहल्याचा विवाह गौतम ऋषींशी सशर्त झाला. तिन्ही लोकाची प्रदक्षिणा घालणाèया वीराशी अहल्या विवाह करणार, अशी अट घातली. त्यामुळे देवराज इंद्र, इतर अधिपती, ऋषी सगळेच अट पूर्ण करण्यास निघाले. गौतम ऋषींनी तीनही लोक व प्रदक्षिणा घालून पण जिंकला. पुढे इंद्रानी छलाने तिच्याशी संग केला आणि गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला. ऋषी लग्न करून स्वेच्छेने तपाला गेले. त्यात अहल्येची अनुमती ग्राह्य धरली गेली. ऋषी गौतम यांचे हे ही म्हणणे होते की, अहल्येच्या सतीत्वाला इंद्राचे जाल कळले नाही का? पुरुष कितीही शिक्षित संस्कारी ज्ञानी झाले, तरीही परदेहावर अधिकार व ताबा मिळवण्याची वासना प्रगाढ असते, हे इंद्र व गौतम ऋषींनी सिद्ध केले. अहल्या शिळा होणे म्हणजे प्राणहीन होणे नव्हे, तर ती एक वस्तू म्हणून भोग व ताब्याचीच राहिली, ही टोचणी होय. स्त्रीच्या अंतःप्रेरणांचा अवमान या निमित्ताने रामाला कळला. स्त्रीच्या मानवी कक्षा अपूर्ण राहिल्या आहेत, हे कळलं. सीता राजयोग आणि राजभोग नाकारून रामासह आली होती. ती त्याची कमजोरी म्हणून नाही तर शक्ती म्हणून आली होती.
women in Ramayana लक्ष्मण पत्नी उर्मिला सहजीवनाचं सर्वोत्तम देऊन माघारी पतीचे घर सांभाळत होती. हे रामाला मिळालेल्या वनवासाचे परिणाम होते, याची जाणीव रामाला होती. त्याने अहल्येला सन्मानाने जीवन बहाल केले, ते याच विचाराने की पुरुषामुळे स्त्री अवहेलना नको. याच प्रवासात एक गोष्ट स्पष्ट झाली की, परतीचा प्रवास जोखमीचा होणार. वाटेत भिल्ल जमातीची स्त्री शबरी भेटली. तिच्या गवसण्याने सेना धाकड आणि निष्णात होती. राजा म्हणजे भूमीवरील देव! त्याने सामान्य मेवा बोरं खाल्ली आणि तो लोकनायक म्हणून जन्माला आला. या शबरीचा समाज रामासह होता. भिल्ल जमातीचा लक्ष्यवेध सगळ्यात पक्का! ते रामासह झाले. वनवासी राम, लक्ष्मण, सीता यांच्यासाठी वनातील वास्तव्य म्हणूनच सुकर झाले आणि पुढे राम रावण युद्धातही कामी आले. याच वनवासात बलाढ्य रावणाची बहिण शुर्पणखा भेट हे एक पर्व! ही भेट काही ती समोर आली आणि झाली अशी नव्हती. त्या काळातील स्त्री ही ज्ञान, आकलन, दृष्टिकोन, विचार, चिंतन याने किती पक्कीहोती, स्वत:च्या आयुष्यातील घटना, स्वाभिमानाबद्दल जागरूक आणि आग्रही होती, हे कळतं. शुर्पणखेचा नवरा विद्युतजिव्हा हा सेनापती होता. कालकेय वैष्णव पूजक होता. रावण शिवभक्त! रावण कालकेय युद्धात रावणाने विद्युतजिव्हाला ठार मारले. तेव्हा शुर्पणखा उन्मळली. क्रोध, अपमान, विरह, एकाकीपण आणि भावाने मारल्यामुळे तुटकं माहेर हे सगळं आयुष्य उध्ववस्त करून गेलं. तिला सूड घ्यायचा होता. पण, रावणाच्या अफाट शक्तीची तिला पूर्ण कल्पना होती.
women in Ramayana रावणाला पराभूत करण्यासाठी तिला योद्धा हवा होता. आपल्या आयुष्याची होरपळ कळून, तिला ध्येय (रावण मृत्यू) देऊन चालना देणं, त्यासाठी परप्रांतात तसा योद्धा मिळावा म्हणून फिरणं व युद्ध योग निर्माण करणं हे शूर्पणखा एकटी करत होती. किती दुर्दम्य इच्छाशक्ती होती तिची आणि वनवासात असलेल्या राम, लक्ष्मण व सीता हे तीन योद्धे तिला गावले. आपल्याला हवंय हे तिला क्षणोक्षणी माहित होतं. शुर्पणखा लग्नासाठी आतुर कधीच नव्हती. तिने तो फार्स करून लक्ष्मणाला आव्हान केले आणि युद्ध बीज रोवले. इकडे रावणाला स्वतःच्या अपमान व सीतेबद्दल सांगितले. आणि रावणाला त्याच्या पुढच्या प्रयोगात सीता हवी होती. ते त्याला शक्य झालं. सीतेच्या ऊर्जा शक्तीची कल्पना राम व लक्ष्मण यांना वनातील शीतल वल्कलं लेऊन तशाच शीतल भागात कुटी उभारून राहणाऱ्या सीतेसाठी लक्ष्मण रेषा आखण्यात आली. ती स्त्री ला पुरूषाचे संरक्षण म्हणून नव्हे, तर तिच्या ऊर्जेला बाहेरून अधिक तापमान मिळायला नको व तिच्या ऊर्जेचा दाह बाकी कोणाला नको. सीतेच्या स्वतःच्या आयुष्यात ती अत्यंत परिपक्व व सात्विक होती. तसेच समाजभान जपणारी. वेषातील रावणाला तिने भिक्षा जरूर दिली पण तो तिच्यावर अत्याचार करू शकला नाही. कारण तिचे तेज. ते रावणाला दाहक होते. रावणाला त्याचे सर्वोच्च निर्माण संशोधन पुढे न्यायला सीतेचा अभ्यास जरूरी होता. कारण त्याला शिवाचे वरदान होते की अस्त्र शस्त्र मंत्र तंत्र कशानेच त्याला मृत्यू येणार नाही. आणि रावणाला सामान्य भीती वाटत नसे. त्याला मानव निर्माण करण्याची शक्ती मिळवायची होती, जेणेकरून तिन्ही लोकांचा तो स्वामी होईल.
women in Ramayana ह्याबाबत सीतेला माहिती होती. ती तिला मंदोदरीने दिली. सीतेचे आत्मबळ हे रामापेक्षाही सरस. ती परप्रांतात वाटिकेत राहिली, तेही स्वतःच्या अटींवर. कुठलेही संसाधन, शस्त्र किंवा सेवक सोबत नसताना सीता परदेशात जाऊनही रावणाला त्यांच्याच देशात धरते, हे अलौकिक सत्य आहे. हे स्त्री च्या स्वयंपूर्णतेचं प्रतिक आहे. हीच सीता अग्निपरीक्षा देते. ती देऊन जीवंत असते कारण तिची शारीरिक ऊर्जा ते सहन करू शकते. इतर सामान्य जन्माला आलेली व्यक्ती अग्नीत भस्मच होणार. रामाने एका नागरिकाच्या म्हणण्यानुसार तिचा त्याग केला, तरीही दोन सुदृढ मुलांना तिने जन्म दिला आणि सर्व विद्या पारंगत केलं. इतकं की ते बलाढ्य रघुवंशाच्या अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवून युद्ध जिंकले. स्त्रीच्या आत्मोन्नतीचे हे पहिले उदाहरण! मुलं वाढवण्यास तिला पतीची गरज पडली नाही, हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आणि सीतेला तब्येतीला प्रासादापेक्षा वन जास्त महत्वाचे! सीतेची मंदोदरीशी एकदाच भेट झाली. मंदोदरीने रावणाला स्मरण करून दिले होते की, सीता तुमची कन्या आहे. तेव्हा रावण सीतेशी विवाहेच्छुक नाही, हे तिला कळले होते. पण, जर पुरुष एखाद्या स्त्रीला भोगणार नसेल, हातही लावणार नसेल, मारणार ही नसेल, कुठलीही राजकीय भूमिका नसेल आणि तरीही तिला बंदी ठेवत असेल, तर हे जगाच्या सामान्यपणे असलेल्या व्यवहारापेक्षा भीषण काही आहे, हे मंदोदरीला कळलं. हे गूढ काहीतरी आक्रीत आणणार, हे कळून मंदोदरी सीतेस सांगते की, रावणाच्या कुठल्याही आमिषांना बळी पडू नकोस. अगदी तुझा पती राम जर रावणाने दाखवला तरीही विश्वास ठेवू नकोस आणि इथून सुटका करून घे.
women in Ramayana मंदोदरी अत्यंत हुशार, देखणी, मार्दवी, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आजच्या राजस्थानात माहेर असलेली, शिवभक्त मायासूर व हेमा नावाच्या अप्सरेची मुलगी. तिच्या रूपगुणांची किर्ती ऐकून प्रकांड पंडित रावण तिच्याशी विवाहबद्ध झाला. आपल्या प्रेमाची ग्वाही म्हणून रावणाने मंदोदरीस सोन्याची लंका भेट दिली. विद्यावान, बलवान व कीर्तीवान रावण हा आपला पती म्हणून त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारला, तेव्हापासून मंदोदरीच्या रावणावरील प्रेमात तसूभरही घट नाही. ती बलबुद्धीने समर्पित अशी तल्लख प्रेयसी होती. ती रावणाचे मानसिक आणि भावनिक कवच होती. एक मुलगी असावी, ही मंदोदरीची इच्छा रावणाने आपल्या वैद्यकीय ज्ञानाने संपन्न केली. पण, त्या निर्मितीत शरीरऊर्जा वाजवीपेक्षा फार जास्त उत्पन्न झाली. त्यामुळे, तिला थंड प्रदेशातील मित्रास दत्तक दिली. पण, रावण भविष्यात काहीतरी विदारक अनियंत्रित बाब करेल, ज्याचे परिणाम विध्वंसक असू शकतील, हे कळून तिने सीतेला परत पाठवण्याची विनंती केली. पण, रावणासाठी मानवनिर्मिती करणे हा एकमेव प्रयोग करायचा उरला होता. त्यासाठी, तो जे होईल ते स्वीकारणार होता. त्यासाठी तो अंतिम उपलब्धी होता आणि शिवाच्या वरदानामुळे मरणाची भीती नव्हती. शिवाय, बोलून चालून राम सामान्य माणूस! वयाने, अस्त्रशस्त्राने लहान! पण, मंदोदरीचे आकलन वेगळे होते. ती हनुमानाला भेटली तेव्हाच, तिला राम लक्ष्मणाच्या संकल्पाबाबत खात्री पटली.
women in Ramayana युद्धात रावणाचा मृत्यू अशक्य होता, हे रामास लक्षात आले. हनुमान व मंदोदरीच्या मैत्रीतून हनुमानाने तिच्याकडून गुपित उघड केले. रावण वध झाला. बिभीषण आता रामासह आला आणि लंका पोरकी होऊ देणं मंदोदरीला पटलं नव्हतं. ती तिच्या रावणाने, तिच्यासाठी केली होती. ते जपण्यास राजकीय सल्लागार आणि रामाच्या सांगण्यावरून तिने बिभीषणाशी राजनैतिक विवाह केला आणि आपलं राज्य चालवलं. हे सगळं ज्या ताकदीनं मंदोदरीने केलं, त्याला आजही नाही. यामध्ये बाली पत्नी ताराही महत्त्वाची स्त्री! तिचे राजकीय व सामाजिक ज्ञान, तिचे वन्य कायद्याचे ज्ञान, स्वभाव पारख, मानवी व पशूंचे वर्तन ज्ञान समग्र होते. तिने बालीला प्रत्येक वेळी योग्य सल्ला दिला आणि तो यशस्वी ठरला. जेव्हा ऐकले नाही, तेव्हा तो मृत्युमुखी पडला. तारा आणि बाली यांचा मुलगा अंगद रामास सोपवला. पुढे ताराचे लग्न सुग्रीवाशी झाले. लंकेवर आक्रमण वा युद्धासाठी ताराकडून माहिती व मार्गदर्शन मिळत गेले कारण, प्रादेशिक रचना, हवामान, संसाधने, संस्कृती आणि अस्मिता यांचा अभ्यास इतक्या कमी वेळात करणं अशक्य होतं. ते तारामुळे करता आलं. रामरावण युद्धात व त्याआधीच्या घडामोडी पाहता, लक्ष्मण व हनुमान हे दोघेही एकाच लक्ष्याने प्रेरित होते. पण, रामासाठी हे युद्ध केवळ राम रावण युद्ध नव्हते. लोकजीवन व संस्कृती संवर्धनासाठी, जैवविविधता जपण्यासाठी एक जागृत प्रयत्न आणि प्रक्रिया सुरू करणे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून, सर्व प्राणीमात्रांनी सभ्यता राखून समाज विकसित करण्याचे साध्य गाठणे, हे रामाचे उद्दीष्ट!
women in Ramayana हनुमान रामाचा अनुयायी होता अन् वानर हे माणसाचे मूळ! त्यामुळे हनुमान रामापेक्षा वयाने मोठे असूनही, उत्क्रांती पावलेला मानव हा ज्ञानानेही समृद्ध झालेला होता. त्याचा अनुनय म्हणूनच रास्त होता. ज्ञान हेच सत्य, हे माता अंजनीला ठाऊक होते. तिने हनुमानाच्या रामभक्तीला चालना व प्रेरणा दिली आणि स्वामी आज्ञा सर्वोपरी हे हनुमानाचे सूत्र! त्यामुळे लंकेत उत्पात हा त्याचा परिणाम! पण, नंतर हनुमान थांबला आणि संजीवनी आणण्याचं महत्कार्य करून गेलाय. संजीवनी आणण्यास हिमालयात जायचे होते. वैद्य सुषेण यांनी जी माहिती सांगितली, ती अतिशय नवी असल्याने हनुमानाने पर्वतच उचलला, अशी कथा आहे. परतीच्या प्रवासात अयोध्येवरून जाताना नंदीग्रामही लागले. अपरिचित आकृती हवेत दिसली म्हणून भरताने बाण मारला. हनुमानाने परिचय दिला आणि लक्ष्मणाच्या मुर्च्छेचं संकट सांगितलं. रामभक्तीच्या समान वाटेवर दोघांनी निरोप घेतला. पण, इथे रामायणातील सर्वात महत्वाची भूमिका बजावली उर्मिलाने! मंथरा दासीच्या अनाहूत सल्ल्यानुसार सगळ्या संवेदना गोठवणारी घटना म्हणजे रामास वनवास! घर, राज्य, नातेसंबंध, जिव्हाळा विस्कळीत झालेला! अशा परिस्थितीत राग अनावर होतो आणि तो मंथरेवर हल्ला करतो. अयोध्येतील परिस्थिती अत्यंत बिकट! राजा दशरथाचा मृत्यू झालेला, त्याच्या राण्या किंकर्तव्यमूढ, दोन राजपुत्र वनवासात, ज्याला राज्य चालवायचे तो राजा भरत नंदीग्रामात आणि शत्रुघ्नची मन:स्थिती उद्विग्न झालेली! एकूणच विमनस्क अवस्थेतील अयोध्या हे इतर राजांचे भक्ष्य असते. पण, हे सगळं अयोध्येत राहून सांभाळत होती ऊर्मिला!
women in Ramayana ती चौदा वर्षे निद्राधीन होती, ही एक कल्पनाच! उपनिषदात विदीत आहे की, आहार, निद्रा, भय आणि मैथून या प्रेरणा प्रत्येक प्राणीमात्राला जन्माला येतानाच सोबतीने येतात. जन्मप्रेरणा! केवळ धर्माचरण मानवाला उन्नत करत जातं. त्यामुळे लक्ष्मण चौदा वर्षे झोपला नाही आणि उर्मिला झोपून होती, हे एक उच्च काल्पनिक समर्पण! पण, कुठलाही जीव मूळ प्रेरणांना नाकारू शकत नाही. ही झोप नव्हती. ऊर्मिलेने लक्ष्मणासह आपले प्रेम जीवन, सहवास अंतरात बंदिस्त करून, सर्वोत्तम सहजीवनाचा परिचय दिला. पती मोहिमेवर असताना, तिने प्रासाद आणि त्याच्या जीवनातील सर्व व्यक्तींना चौदा वर्षे सांभाळले. इक्ष्वाकु वंशाचा रघुवंश होण्यात उर्मिला या योद्ध्याचे बहुमोल योगदान आहे. मानव हा प्राण्यापेक्षा त्याच्या उन्नत होत जाणाऱ्या बुद्धिमत्ता, तरतमभाव विच्छेद, विवेक, विश्लेेषक शक्ती, भावनाप्रधानता व स्मृतीसंचयामुळे वेगळा ठरतो. म्हणूनच तो भूपती म्हणून प्रसिद्ध झाला. पृथ्वीवर सर्वात शक्तिशाली प्रजाती म्हणजे मानव! याच स्मृती त्याला मार्गदर्शन करतात व मार्गहीनही! या पार्श्वभूमीवर ऊर्मिलेचे स्थितप्रज्ञ जबाबदार वर्तन जगात सर्वोच्च आदर्श म्हणून मानले जावे कारण, एकसंध सांभाळून ठेवलेले घराणे म्हणूनच पुढे कीर्तीमानकं गाठू शकले. पुरूषाला पुरूषार्थ कमावण्यास परीघ विस्तीर्ण असावा लागतो. तो विस्तीर्ण करून देणारी ही स्त्री असते. उर्मिला ती स्त्री आहे. निश्चित काळाचा वनवास होता, पण बाकी सर्व घटना अनिश्चित असणार होत्या.
women in Ramayana परतीचा प्रवास अत्यंत अवघड होता, हे उर्मिला जाणून होती. त्या परिस्थितीतही तिने घर, घराण्याची परंपरा, राज्य आणि जनता यांचे उत्तम संचलन केले. उर्मिलेचे स्वतःचे मानसिक व भावनिक आरोग्य हे तिच्या सुबुद्ध आणि ज्ञानी प्रगल्भतेचे प्रतीक होते. कारण, लक्ष्मण वनातून परतल्यानंतर तिला संतती प्राप्ती झाली, ती संपूर्ण सुदृढ होती. उर्मिला ही महानतेची परमावधी ठरते. सीता परतल्यावर एका क्षणात तिने अधिकार, पद, पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान त्यागले आणि ते सीतेला सुपूर्द केले. स्वतःला रिक्तकरून पुढे गेलेली अशी स्त्री ती तोपर्यंत एकमेव होती. उर्मिलाने कोणाला जाब विचारला नाही, माहेरी गेली नाही, विकारी झाली नाही. जिथे विकार विकृती नाही, ती उन्नत प्रकृती...ऊर्मिला तीच प्रकृती ! रामाला ज्या मुल्याधिष्ठित सभ्य समाजाची निर्मिती करायची होती, त्या मागे या स्त्रियांनी चिरंतन व लौकिक अशा मुल्यांची भक्कम पायाभरणी केली आणि ती पुढील स्त्रीकडे पारित केली. राज्य भलेही राजा करतो, त्याला नीती अधिष्ठान तिथली स्त्री करते.
women in Ramayana स्त्रीच्या अमर्याद प्रेम, ऊर्जा, शक्तीची जाणीव रामाला होती. ती सृजनाची प्रेरणा आणि निर्माती आहे. तिच्या परिघाचा आवाका विशाल आणि उन्नत आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप, अंमल, शिरकाव, ताबा नसणे, ही मर्यादा प्रत्येक पुरुषाची असावी. हा विचार रामाच्या वर्तनाने सिद्ध होतो. रामाने ही मर्यादा मान्य केली आणि तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सिद्ध झाला. भेदरहित लोकशाही निर्माणाची बीजं आपल्याला राम गाथेत आढळतात. समाजातील व्यक्तीला समान सन्मान देणारा शीराम! त्याच्या निर्णयाला आव्हान न देणारी तुल्यबळ सीता! पतीपेक्षा राजा राम महत्वाचा! तो राज्याचा कुटुंबप्रमुख! तो सीतेने दिलेला आणि सीतेला हे सगळं ऊर्मिलेने सुपूर्द केलेलं! या लोकनायकाला म्हणूनच लोकाभिराम शीराम म्हणतात. या शक्तिशाली स्त्रीयांना आदरपूर्वक अभिवादन, ज्यांनी राजा राम दिला. इतर अनेक कथा, गाथा, ग्रंथ लिहिले पण, आदर्श समाज स्थापनेच्या युद्धाची ही गाथा अजरामर झाली, ती यातील स्त्रीयांमुळे!
7709047933