न्यूझीलंड,
Power cut in New Zealand vs Pakistan 3rd ODI Viral Video पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली. पाकिस्तानचा फलंदाज तय्यब ताहिर हा न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा सामना करत असताना अचानक स्टेडियममधील वीज गेली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण मैदान अंधारात बुडाले. या अंधारात ताहिरने प्रसंगावधान राखत क्रीज सोडून मागे पळ घेतल्याने तो मोठ्या अपघातापासून बचावला.
ही घटना पाकिस्तानच्या डावातील ३९व्या षटकादरम्यान घडली. न्यूझीलंडचा गोलंदाज जॅकब डफी हा तय्यब ताहिरला चेंडू टाकत असताना अचानक फ्लड लाइट्स बंद झाल्या. चेंडू सोडण्यात आल्यानंतर मैदानात अंधार पसरला आणि ताहिरने क्रीज सोडून मागे धाव घेतली. अंधारात चेंडू विकेटकीपरकडे गेला, मात्र तो पकडला गेला की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. कमेंटेटर्सदेखील या प्रसंगामुळे काही काळ गोंधळले होते. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही आणि ताहिरला दुखापतही टळली.तय्यब ताहिरने या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये ३३ धावांची खेळी केली. दरम्यान, स्टेडियममधील दिवे अचानक बंद झाल्याचा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर क्रिकेटप्रेमींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.Power cut in New Zealand vs Pakistan 3rd ODI Viral Video
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने खिशात घातली. याआधी त्यांनी टी२० मालिकाही ४-१ ने जिंकली होती. तिसऱ्या वनडेमध्ये पावसाचा व्यत्यय असतानाही न्यूझीलंडने ४२ षटकांत ८ बाद २६८ धावा केल्या. कर्णधार मायकल ब्रॅसवेलने ५९, तर रियस मारियूने ५८ धावा फटकावल्या. पाकिस्तानकडून अकीफ जावेदने ४ तर नसीम शाहने २ बळी घेतले.२६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, न्यूझीलंडच्या बेन सियर्सने ५ बळी घेत पाकिस्तानचा डाव उध्वस्त केला. पाकिस्तानकडून बाबर आझमने ५०, मोहम्मद रिझवानने ३७, तर तय्यब ताहिर आणि अब्दुल्ला शफी यांनी प्रत्येकी ३३ धावांचे योगदान दिले.