नागपूर,
cummins college-Nagpur आपल्या भागात ज्या प्रकारचे उद्योग आज आहेत किंवा भविष्यात येणार आहेत, त्यांचा विचार करून कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू व्हायला हवेत. त्यादृष्टीने रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
cummins college-Nagpur महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिंगणा प्रकल्प परिसरात प्रस्तावित मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते झाले. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला आ. समीर मेघे, कमिन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेता आर्या, मुख्य प्रशासकीय अधिकारी आशीष अग्रवाल, कार्याध्यक्ष रवींद्र देव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
cummins college-Nagpur नितीन गडकरी म्हणाले की, आपली संस्था मिहानच्याच शेजारी आहे. तेथे टेक महिंद्रा, एम्स, आयआयएम, एमआरओ सर्व प्रकारचे उद्योग इथे आले आहेत व अजून मोठ्या कंपन्या येणार आहेत. त्या साèयांना मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी उद्योगांसोबत समन्वय साधणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भविष्यात उपयोगाचे असणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.
cummins college-Nagpur समाजात भेद असताना महिलांना बरोबरीचे अधिकार नसताना महर्षी कर्वे यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य केले. आजही समाजात सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. त्यात पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचाही समावेश आहे. नागपुरातही ही संस्था उत्तम काम करत आहे, असे गौरवोद्गाररही गडकरी यांनी काढले. प्रारंभी महर्षी कर्वे, बाया कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पार्प, संस्थेचे गीत सादर झाले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.
cummins college-Nagpur प्राचार्य डॉ. मिलिंद खानापूरकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. श्वेता आर्य, आशीष अग्रवाल यांनी विविध उपक्रमांद्वारे कमिन्स इंडियाच्या सहयोगाची हमी दिली. संस्थेचे सचिव डॉ. पीव्हीएस शास्त्री, श्रीकांत चितळे, सीताबाई नरगंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपा वर्मा तसेच उद्योग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. अतिरिक्त कार्याधिकारी प्रदीप जोशी, प्रा. पल्लवी गणोरकर तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
cummins college-Nagpur महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे, ही 128 वर्षांची पालक संस्था शिक्षणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. नागपुरातील कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाची स्थापना कमिन्स इंडिया फाऊंडेशन या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाच्या उदार सहकार्याने 2010 साली करण्यात आली. हिंगणाच्या कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय परिसरात 1080 मुलींसाठी 11 मजली नवीन वसतिगृह 1850 चौरस मीटर जागेवर बांधले जात आहे.