लातूर,
suicide-Latur-manohare महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये मनोहरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या लातूरमध्ये उपचार सुरु आहेत.
आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि रुग्णालयासमोर पोलिसांचा ताफा
(छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
suicide-Latur-manohare बाबासाहेब मनोहरे हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसोबत जेवले, गप्पा मारल्या. त्यानंतर बाबासाहेब मनोहरे हे खोलीत गेले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय खोलीत गेले, त्यावेळी बाबासाहेब जखमी अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
suicide-Latur-manohare बाबासाहेब मनोहरे हे कठोर शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले होते. ते लातूर महानगरपालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते. नंतर त्यांना बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. लातूर पोलिसांनी बाबासाहेब मनोरे यांच्या घरी जाऊनही घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
suicide-Latur-manohare रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे यांच्या डोक्यातून गोळी उजव्या बाजूने आरपार निघाली. यात मनोहरे यांची कवटी फुटली असून मेंदूच्या काही भागाला इजा झाली आहे. तुटलेल्या कवटीचे काही तुकडे बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूत पसरले आहेत. यासाठी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांकडून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.