लग्नातून पैशांंचे पॉकेट लांबवणारी टोळी गळाला

सव्वा लाखाची रोख जप्त

    दिनांक :08-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Cash worth 1.25 lakh seized शहरातील एका हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नातून १ लाख २० हजारांचे भेट स्वरुपात देण्यात येणारे पैशांचे पाकीट अज्ञाताने चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत चोरीला गेलेली १ लाख २० हजारांची रोख जप्त केली. याप्रकरणी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडीया सांसी येथील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
 
Cash
 
सिंदी मेघे येथील अनिल भोवरे यांच्या मुलीचा लग्नसोहळा आलोडी परिसरातील एका मंगल कार्यालयात सुरू होता. वधू-वरास नातेवाईकांकडून भेट म्हणून देण्यात येणारे पैशांचे पाकीट अज्ञात चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार देण्यात आली. Cash worth 1.25 lakh seized स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता सदर गुन्हा देशातील विविध राज्यात लग्नसमारंभात मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडीया सांसी येथील आंतरराज्यीय टोळीने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बसंत कुमार धपाणी (३७), हसंराच छायल (३२) व एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. कडीया सांसी यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
 
या तिघांनाही अटक करण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांची चाहूल लागली आणि गावातून पसार झाले. पोलिसांनी आरोपींचा नातेवाईक अतुल सिसोदीया याच्या घराची झडती घेतली असता चोरीला गेलेली रोख १ लाख २० हजार रुपये मिळून आली. ही रक्कम जप्त करून सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. Cash worth 1.25 lakh seized फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत यांनी केली.