बेसा-बेलतरोडीच्या रस्त्यांवर भेगा

सिमेंट रस्त्यांची दयणीय अवस्था

    दिनांक :09-Apr-2025
Total Views |
परिसरातील नागरिक त्रस्त
नागपूर,
Besa-Beltarodi बेसा-बेलतरोडी येथील रहिवासी मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त झाले आहेत. मुख्य मार्गावरील सिमेंट रस्ते तसेच अंतर्गत गल्ल्यामधील रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. नवीन वसाहतीतील बहुतेक रस्त्यांवर भेगा दिसून येतात. यामुळे स्थानिक नागरिकांना अपघाताची भीती असते. सिमेंट रस्त्यांनाही भेगा पडल्याने वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची दयणीय अवस्था झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

 
Besa-Beltarodi
 
पावसाळयात सर्वाधिक त्रास
या भागातील रहिवासी २००३ मध्ये राहण्यासाठी आले, तेव्हा रस्ते नव्हते मात्र आता सिमेंट रस्त्यांचा पायवा मजबूत न केल्यामुळे भेगा वाढल्या आहेत. Besa-Beltarodi पावसाळयात सर्वाधिक त्रास सहण करीत मार्गक्रमण करावे लागते, त्यामुळे पुलाची निर्माण झाली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

मार्गावरील खड्डे व सिमेंट रस्ते धोकादायक
बेसा-पिपळा नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत नंदनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने रस्ते बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. Besa-Beltarodi निधी मिळताच डागडुजीसह रस्त्यांचे काम हाती घेतल्या जाईल. शेत जमीनीच्या काळया मातीत घरे बांधल्यानंतर सिमेंट रस्ते तयार करण्यात आता या मार्गावर खड्डे व सिमेंट रस्ते वाहनचालकांसाठी धोका ठरत आहे. जड वाहतूक झाल्याने ही समस्या वाढली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. काही अनधिकृत लेआउट्सच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याने या भागात विकासाचे कामे सुरु करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.