एकाच वेळी तीन महिलांच्या नरडीचा घोट घेतला वाघाने!

*बळी पडलेल्यांमध्ये सासू-सुनेचा समावेश *चारगाव रोड जंगल परिसरातील घटना

    दिनांक :10-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
सिंदेवाही,
Tiger attack : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याच्या मेंढामाल येथील काही महिला चारगाव रोड लगतच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान वाघाने हल्ला त्यांच्यावर हल्ला चढवला आणि तीन महिलांना ठार केले. मृतकांत शुभांगी मनोज चौधरी, कांता बुद्धाजी चौधरी अशा एकाच परिवाराच्या सासू-सुनेचा समावेश आहे. सोबतच सारिका शालिक शेंडे यांच्याही नरडीचा घोट वाघाने घेतला. ही घटना शनिवार, 10 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.
 
 
 
JKLJ
 
 
 
गावातील महिला शनिवारी सकाळी 7 वाजता मेंढामाल गावा जवळील चारगाव रोड जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. मात्र, दुपार होऊनही त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अखेर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली. माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहायक गडपायले व वनरक्षकांनी जंगल परिसरामध्ये शोध घेतला असता, तिन्ही महिलांचे मृतदेह दुपारी 4 वाजताच्या सुमारास सापडले. या घटनेने परिसरात दशहत निर्माण झाली आहे. एकाच दिवशी एकाच परिसरात तीन महिलांना यमसदनी पाठवून अन्य एका महिलेला वाघाने जखमी केल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी.
 
 
त्याच परिसरात वाघाच्या हल्ल्यात अन्य महिला जखमी
 
 
तालुक्यातील चारगाव बडगे गावानजीकच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या अन्य एका महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवार, 10 मे रोजी सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास घडली. वंदना विनायक गजभिये असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास परिक्षेत्र सिंदेवाही उपक्षेत्र सिंदेवाही नियतक्षेत्र-डोंगरगाव कक्ष क्रमांक 252 च्या जंगल परिसरात चारगाव बडगे येथील वंदना गजभिये ही महिला तेंदू पाने गोळा करण्यासाठी गेली होती. त्यांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.