वैनगंगा नदीत वैद्यकीय महाविद्यालयाचे 3 विद्यार्थी बुडाले

*शोध मोहिमेत कुणीच हाती लागले नाही

    दिनांक :10-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
सावली, 
Wainganga River : सावली तालुक्यातील व्याहाड बूज. जवळील वैनगंगा नदीत शनिवार, 10 मे रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील मेडिकल कॉलेजचे प्रथम वर्षात शिकत असलेले तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाल्याची घटना घडली.
 
 
JHK
 
 
 
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज. जवळील वैनगंगा नदीच्या पुलाखाली शनिवारी गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज येथील गोपाल गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्निल उद्धवसिंग शिरे, शिवम श्रीधर जायभाई, सार्थक राजेश पाठक, सुजित धनाजी देशमुख हे विद्यार्थी आंघोळीसाठी गेले होते. ते आंघोळ करत असताना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास 6 विद्यार्थ्यांपैकी तिघे जण बुडाल्याची माहिती त्यातील तीन विद्यार्थ्यांनी दिली.
 
 
गोपाल साखरे (20, रा. चिखली, जि. बुलढाणा), पार्थ जाधव (20, रा. शिर्डी, जि. अहमदनगर) व स्वप्निल शिरे (20, रा. संभाजीनगर, औरंगाबाद) अशी वैनगंगा नदीमध्ये बुडाल्यांची नावे आहे. विशेष म्हणजे, महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच ठिकाणी चंद्रपूर येथील 3 मुलींचा पोहत असताना बुडून मृत्यू झाला होता.
 
 
या घटनेची माहिती सावली पोलिस ठाण्याला मिळताच काही वेळ शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. तोपर्यंत कुणाचाही शोध लागला नव्हता.