नागपूर,
Bhandara Road Nagpur भंडारा रोडवरील एसबी टाउन जवळ कटारिया मंगल कार्यालयात,४ मे रोजी, नामकरण समारंभ झाला. या प्रसंगी एका व्यक्तींची सोन्याची अंगठी हरविली होती. ती अंगठी दिघोरीच्या प्रमिला मोहोड यांना सापडली. त्यांनी चॊकशी केली असता ,योग्य माहिती मिळाली नाही.दोन दिवसांनंतर अंगठी कोणाची आहे हे तपासाअंती कळले.
चिकणा, हुडकेश्वर येथील विशाल चरडे यांची ती होती. Bhandara Road Nagpur अंगठीचे वजन ७ ग्रॅम होते. प्रमिला मोहोड यांनी अंगठी विशाल चरडे यांना सुपुर्द केली विशाल चरडे यांनी प्रमिला मोहोड यांचे खूप खूप आभार मानले.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र