नागपूर,
Hotel Springdale Wardha Road त्रिस्कंध अल्युमनि अँड एस्ट्रोलॉजर्स असोसिएशनच्या वतीने पितृशाप मातृशाप आणि पास्ट लाईफ रिग्रेशन या विषयावर हॉटेल स्प्रिंग डेल वर्धा रोड येथे कार्यशाळा घेण्यात आली.वरील तीनही विषयांचा समन्वय आणि कुंडलीच्या आधारे पास्ट लाईफ सत्र केलेल्या जातकांचे पूर्व जन्माचे योग शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट करण्यात आले.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष मिलिंद केकरे यांनी पितृशाप त्याबद्दलचे नियम ज्योतिषीय ग्रंथांच्या शास्त्राच्या आधारे समजावले आणि कुंडलीतील नियमांचे प्रमाण दाखवून स्पष्टीकरण केले. संस्थापक व त्रिस्कंध वेदांग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद मोहोळकर यांनी मातृशाप या विषयावर व्याख्यान देताना कशा प्रकारे हे सर्व शाप कार्यान्वित होत असतात, त्याचे परिणाम दिसतात, शाप म्हणजे काय ? हे आध्यात्मिक आधार घेऊन विविध ग्रंथांचे प्रमाण देत सुरुवातीला प्रास्ताविक करून नंतर शाप म्हणजे कुंडलीतील कुठल्या ग्रहांमुळे कसे त्रास होतात आणि त्यावर काय उपाययोजना कशा पद्धतीने करावी हे सर्व सखोल रीत्या समजावून सांगितले
रेवती देशपांडे यांनी पास्ट लाइफ रिग्रेशन काय असते, त्याचा काय संबंध कशाप्रकारे प्राचीन विद्या कार्य करते आणि त्यामध्ये काय त्रुटी मानल्या जातात त्यामुळे त्यांच्या शास्त्रावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते हेही सांगितले. त्यांनी घेतलेले सत्र त्याचे अध्यक्ष आणि संस्थापक यांनी कुंडलीच्या आधारे सांगितलेले अचूक फलादेश यामुळे ज्योतिष शास्त्राच्या आधारे कशाप्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो याची खात्रीपूर्वक मान्यता त्यांनी दिली.
शेवटी तिन्ही वक्ते मिळून विविध कुंडल्या मध्ये दोन्ही शास्त्रांचा समन्वय साधून विविध नियम आणि ग्रंथाचा आधार घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या विश्लेषण केले.Hotel Springdale Wardha Road प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन अभ्यासकांच्या शंकांचे उत्तम निरसन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून कुठलीही प्राचीन विद्या अंधश्रद्धा नसून त्यामागे ज्योतिष शास्त्रीय शास्त्रकारांनी अध्ययनातून ग्रंथांमध्ये वर्णित नियमांचाअवलंब करून अध्ययन केले तर निश्चितपणे सत्यता दिसून येईल स्पष्ट केले.ही कार्यशाळा अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजसी राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव डॉ कीर्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: डॉ कीर्ती पाटील,संपर्क मित्र