पोलिसांची गोवंश तस्करावर पुन्हा कारवाई

11 May 2025 20:14:40
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
cow smugglers : स्थानिक सहपोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे आपल्या पथकासह गक्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका अशोक लेलॅन्ड ट्रकमधून गोवंश तस्करी होत आहे. त्यामुळे त्यांनी केळापूर टोल नाका येथे नाकाबंदी करून ट्रक कमांक एमएच40 सीटी2954 हे वाहन पकडून त्याची पाहणी केली. यात एकूण 15 गोवंशीय बैलांना क्रूरतेने दोरीने घट्ट बांधून कत्तलीसाठी, तेलंगण राज्यात घेऊन जात असल्याचे आढळून आले.
 
 
 
jklj
 
 
 
या ट्रकमध्ये असलेल्या 15 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात येऊन आसिफ सुलतान कुरेशी (वय 48), शेख बब्बू शेख मुसा (वय 38) व आकिब मोहम्मद आरिफ कुरेशी (वय 22, तिघेही राहणार आझादनगर, टेका नाका, नवीन वस्ती, नागपूर) यांच्या विरोधात पांढरकवडा पोलिस ठाण्यात गौरव नागलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
यावेळी पोलिसांनी 15 गोवंशीय जनावरे 3 लाख, एक ट्रक 17 लाख रुपये असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वात सहपोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे, प्रफुल्ल पावसेकर व गौरव नागलकर यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0