आरोग्यदायी घटकांनी समृद्ध फळांच्या राजा आंबा
नागपूर,
mangoes-Nagpur-Kalmana अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीवर परिणाम झाला असताना आता पुन्हा फळांचा राजा आंब्याची मागणी वाढली आहे. नागपूर दक्षिणेकडील आंबा सर्वाधिक प्रमाणात येतो. यात प्रामुख्याने बैगनफल्ली, बदाम, दशेरी, लंगडा, लालबाग, सुंदरी, केसर, हिमायत, हापूस आदींची मागणी होत आहे. मात्र, आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम किंवा कॅल्शियम कार्बोनेट तसेच इथिलीनचा मोठ्या प्रमाणावर वापर जात असल्याने मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळेच आंबे जरा जपून खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
mangoes-Nagpur-Kalmana आंध्र प्रदेशातील वारंगल येथून बैगनफल्ली, बदाम, केशर आदी आंब्याची चांगली आवक होत असून देवगड आणि रत्नागिरी येथून हापूस आंबा येत असला तरी हापूस आंब्याची मागणी कमी असल्याची माहिती कळमना फ्रूट मर्चंट असोसिएशनच्या ठोक फळ विक्रेत्यांनी दिली आहे. शहरातील फळ विक्रेत्यांकडे बैगनफल्ली १००रुपये प्रतिकिलो, बदाम १२०/१०० रुपये प्रतिकिलो, दशेरी १४० रुपये प्रति किलो, लंगडा१२० रुपये प्रति किलो, लालबाग १२० रुपये प्रति किलो, सुंदरी १००रुपये प्रति किलो, केसर २००रुपये प्रति किलो, हिमायत १२० रुपये प्रति किलो, हापूस २०० रुपये प्रति किलो प्रमाणे विकल्या जात असल्याची माहिती बाजारातील फळ विक्रेते किशोर बावरे यांनी दिली.
mangoes-Nagpur-Kalmana मुख्यत: मार्च ते जून पर्यंत आंबा विक्रीचा व्यवसाय चालतो. नागपूर शहरातील कळमना फळ बाजारात दररोज १५ ते २० ट्रक आंब्याचे येतात. येथून संपूर्ण विदर्भात आंबे विक्रीसाठी पाठविल्या जाते. याशिवाय गुजरात, कोकणातील देवगड, रत्नागिरी तसेच दक्षिणेतून मोठया प्रमाणात आंब्याची आयात होते. उन्हाळ्यातील कडक उन्ह तापताच आंब्याची मागणी ग्राहकांकडून होत असते. यात प्रामुख्याने बदलत्या वातावरणाचा फटका आंब्याला बसला असला तरी रसाच्या आंब्याला मागणी कायम आहे. फळ बाजारात दक्षिणेतील आंब्यांची सर्वाधिक विक्री होते. हापूसच्या किमती घसरल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. तर केशरही आवाक्यात असल्याने खप वाढला आहे.
mangoes-Nagpur-Kalmana मार्च महिन्यात हंगाम सुरू झाल्यानंतर शहरातील सर्वच बाजारपेठेत आंबा दिसून येतो. फळांच्या राजा सुरुवातीला महाग मिळतो मात्र आवक वाढल्यानंतर आंबा स्वस्त दरात उपलब्ध होतो. गेल्या काही दिवसांपासून आंब्याच्या दरात घसरण झाल्याने आंब्याचा रस घरोघरी होत आहे. आंब्याचे दर आवक्यात असल्याने मागणी वाढली आहे. आरोग्यदायी घटकांनी समृद्ध असलेल्या आंब्यामध्ये अ जीवनसत्त्व आहे. गरामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड, बीटा कॅरोटीन असते. आंब्याचा गर आणि साल यामध्ये पोटॅशियम, कॉपर, झिंक, मॅगनीज, लोह आणि सेलेनियम ही अॅन्टीऑक्सिडन्ट खनिजे असतात. जी शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळेच उन्हाळयात गोड आंब्याची प्रतिक्षा होते.