रिसोड,
Risod news नाली मध्ये खरकट पाणी का फेकल या कारणावरून महिला व तिच्या दिरास मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना ११ मे रोजी सकाळी ९ वाजता रिसोड तालुयातील मोरगव्हाण येथे घडली. याप्रकरणी वर्षा पंढरी गरकळ या महिलेने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ११ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करून खरखटे पाणी घराचे समोर नाली मध्ये टाकले या ठिकाणी पुष्पा कडूजी गरकळ व सुमित्रा तुकाराम गरकळ या दोघी त्यांच्या घरासमोर आल्या व खरकटे पाणी नाली मध्ये का टाकले या कारणावरून शिवीगाळ करू लागल्या.
त्यांना समजावून सांगितले असता शेजारी राहणारा कडुजी तुकाराम गरकळ हा धावत आल्याने सदर महिलाही घरामध्ये गेली तेव्हा कडूजी गरकळ व तसेच सुरेश किसन गरकळ हे महिलेच्या घरात आले व त्याचे दीर पुरुषोत्तम अभिमान गरकळ याला लाथा बुयाने थापरांनी मारहाण करून शिवीगाळ केली.Risod news या प्रकरणी रिसोड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.