पं. बच्छराज व्यास विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

अपंग विद्यार्थ्यांमध्ये सचित दांडेकर प्रथम

    दिनांक :13-May-2025
Total Views |
नागपूर,
10th Result : राजाबाक्षा, मेडीकल चौक येथील पं. बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ३५६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यात सर्वच ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २८ प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.
 
 

10TH 
 
 
शिक्षकांनी वर्षभर घेतलेल्या सराव परीक्षेमुळेच हे यश मिळविता आले, असा विश्वास सचित संजय दांडेकर व अमृता अमेय एदलाबादकर या व्यक्त केला. अपंग गटातून प्रथम असलेला आणि पं. बच्छराज व्यास विद्यालयातून सुध्दा प्रथम क्रमांक मिळविणारा सचित संजय दांडेकर याने ९८ टक्के मिळविले आहे. तर चारु सोमेश्वर मुंदाफळे हीने ९७ टक्के आणि अमृता अमेय एदलाबादकर हीने ९७ टक्के गुण मिळवून शाळेचे नाव मोठे केले आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ३५६ विद्यार्थी बसले होते. यात शंभर टक्के निकाल लागला आहे.
 
 
यात प्रामुख्याने २८ विद्यार्थी हे ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे आहे. यात सचित संजय दांडेकर ९८ टक्के, चारु सोमेश्वर मुंदाफळे ९७टक्के , अमृता अमेय एदलाबादकर ९७ टक्के, धनश्री योगेश शेरेकर ९६.६०टक्के, जाई राजेश कडू ९६.४० टक्के, प्रशिक जितेंद्र भगत ९५.४०टक्के, सचिन गिरी ९५.२०टक्के, हिमांशू नितीन एदलाबादकर ९३.६० टक्के, हर्ष यशवंत वाघमारे ९३.६० टक्के, स्नेहल जितेंद्र चौधरी ९३.४० टक्के, अथर्व वैभव पुराणिक ९३.४०टक्के, अनुष्का राजेंद्र पाटील ९३.२०टक्के, रुतुजा साळवे ९२.८०टक्के, लक्षण्या येरकेवार ९२.६०टक्के, सुभाष खोबे ९२टक्के, आदिशा रामटेके ९२टक्के, अमोघ हेमंत सालोडकर ९१.६०टक्के, श्रृतिका भारत येला ९१.६०टक्के, मृणाल दिनेश शहारकर अन्वी प्रमोद कांबळे ९१टक्के, सेजल राजेश मेश्राम ९०.८०टक्के, सार्थक श्रीकांत कळमकर ९०.८०टक्के स्वास्ती शाहू ९०.८०टक्के, तन्मी राकेश पिंपलकर ९०.६०टक्के, पूर्वा ज्ञानेश्वर मालेवार ९०.६०टक्के, पियूश सतिश कांबळे ९०.४०टक्के, धनश्री सुनील गुमदेलवार ९०.२०टक्के, दुर्गेश शंकर ठाकूर ९०टक्के गुण मिळविले असल्याची माहिती प्राचार्य रेणुका खडतकर यांनी दिली. तसेच वर्ग शिक्षिका अंजली तिजारे, मोहरील, वैजयंती तिघळे, स्मिता वरभे, संगीता राजहंस, रुचिरा डिडोळकर,मधुरा बक्षी, नयना चौधरी, स्वाती तेलरांधे, गौरी बागडदेव आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
 
शिक्षकांनी घेतलेल्या सराव परीक्षेचा झाला लाभ
 
सचित दांडेकर

satchit-dandekar 
 
 
दृष्टीदोष असलेल्या सचित दांडेकर याने सर्वाधिक गुण मिळवून नागपूर विभागात प्रथम मिळविले आहे. पं. बच्छराज व्यास विद्यालयात पाचव्या वर्गापासून शिक्षण घेत आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश संपादन करता आले. सुयश टेस्ट सिरीजच्या माध्यमातून शिक्षकांनी सराव परीक्षा घेतल्या. त्यामुळेच मला ९८ टक्के गुण मिळविता आले, अशी माहिती सचित दांडेकर याने दिली.
 
 
वर्षभर नियमितपणे ३तास अभ्यास केला होता. स्वतंत्र नोटस काढल्यामुळे मोठा लाभ झाला आहे. यानंतर बारावीचे शिक्षण पूर्ण करीत अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणार आहे. संगणक विज्ञान तसेच एआय विषयात आवड असल्याने याच क्षेत्रात कार्यरत होण्याची इच्छा सचित दांडेकर याने व्यक्त केली.
 
अमृताला व्हायचे आहे डॉक्टर
 

amruta-edlabadkar 
 
 
पहिल्या वर्गापासूनच पं. बच्छराज व्यास शिक्षण घेत असल्याने शिक्षकांसोबत कौटुंबिक वातावरण तयार झाले. वर्ग शिक्षकांनी वर्षभर सराव परीक्षा घेतल्यामुळे सर्वाधिक गुण मिळविण्यात मोलाची मदत झाली असल्याची माहिती अमृता अमेय एदलाबादकर हीने कबुल केले. अमृताने एकूण ९७ टक्के गुण मिळविले असून बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण घेणार असल्याची माहिती तिने दिली. दहावीच्या सर्व विषयांचा सखोल अभ्यास करीत गत वर्षीचे पेपर सोडवून काढलेत. दररोज तीन तास नियमितपणे अभ्यास करीत असताना पुस्तकातील महत्वाचे पाँईंट आदींची नोंद घेतली होती. दहावीच्या अंतिम परीक्षेत प्रश्नांचे उत्तर लिहिताना महत्वाचे पाँईंट आपल्या उत्तरात यायला हवेत. कठीण विषयांचे दडपण न ठेवता हसत खेळत अभ्यास केल्यास आत्मविश्वास वाढतो.