बसपाने दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती साजरी केली

13 May 2025 16:46:18
नागपूर,
Deekshabhoomi जागतिक लोकशाही व समता, स्वातंत्रता, न्याय व बंधुता या मानवी मूल्याचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंती निमित्त बसपाने त्यांना दीक्षाभूमी वरील बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्रिशरण पंचशील घेऊन पुष्प वाहून वंदन केले. यावेळी बसपाने त्यांनी जगाला बुद्धाच्या शिकवणुकीची गरज असून सर्व मानवी प्राण्यांना शांती हवी असेल तर तथागत बुद्धाला स्वीकारले पाहिजे असे आवाहन केले. सोबतच १९४९ चा महाबोधी महाविहार कायदा रद्द करून बुद्धाचे बुद्धगया येथील ज्ञानप्राप्ती स्थळ बौद्धांच्या स्वाधीन करावे असेही आवाहन केले.
 
Deekshabhoom
 
बसपाचे नवनियुक्त नागपूर जिल्हा प्रभारी एडवोकेट राहुल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी रंजना ढोरे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, बामसेफचे मिलिंद वासनिक यांनी मार्गदर्शन केले. Deekshabhoomi कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी तर समारोप पश्चिम नागपूर विधानसभेचे अध्यक्ष अंकित थूल यांनी केला. कार्यक्रमाला प्रामुख्याने भानुदास ढोरे, जीवन वाळके, अरविंद तायडे, प्रणय मेश्राम, प्रेम पाटील, सुमित जांभुळकर, डॉ. शिरीष ढोरे, डॉ. विजया ढोरे यांचे सहित मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0