१० वीच्या परिक्षेतही गोंदिया जिल्ह्याची बाजी

- विभागात दुसरा ः ७८ शाळांचा निकाल शंभर टक्के - दोन विद्यार्थीनी १०० टक्के गुणासह जिल्ह्यात अव्वल

    दिनांक :13-May-2025
Total Views |
गोंदिया, 
SSC Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता आभासी पद्धतीने जाहीर झाला, यात नागपूर विभागात १२ वी नंतर आता दहावीच्या परीक्षेतही गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९२.०४ टक्के लागला असून विभागात नागपूर ९३.४५ टक्के नंतर गोंदिया जिल्हा दुसर्‍यास्थानी आहे. जिल्ह्यातील ७८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून गोंदियाच्या विवेक मंदिर शाळेतील हर्षिता अनिल मदनकर व स्वाती सुनीलकुमार श्रीभाद्रे या दोन विद्यार्थीनींनी १०० टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावले आहे.
 
 

Gondia ssc  
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील इयत्ता १० वी च्या परीक्षा २१ फेबु्रवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडल्या. दरम्यान, आज, मंगळवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, मागील ५ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या १२ व्या वर्गाच्या निकालातही गोंदिया जिल्हा विभागात अव्वल ठरला होता.SSC Result आता मात्र, दहाव्या वर्गाच्या निकालात थोडीफार घसरण झाली असली तरी विभागात नागपूर जिल्ह्यानंतर दुसर्‍या स्थानावर आहे. जिल्ह्यात यंदा ९६८६ मुले व ८८३६ मुली असे १८५२२ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ८६३५ मुले व ८४१३ मुली असे १७०४८ विद्यार्थी पास झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील शाळांचा निकाल पाहता तब्बल ७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून बहूतांश शाळांनी नव्वदी पार केली आहे.
दहावीतही मुलींचाच डंका
नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वर्गाच्या परीक्षेत जिल्ह्यातील मुली सरस ठरल्याचे दिसून आले होते. तर आता १० व्या वर्गाच्या परीक्षेतही मुलीचाच डंका आहे. जिल्ह्यात ८८३६ मुलींनी परीक्षा दिली, ज्यापैकी ८४१३ मुली पास झाल्या असून त्याची टक्केवारी ९५.२१ आहे. त्या तुलनेत मुले माघारले असून ९६८६ मुलांपैकी ८६३५ मुले पास झाले आहे. ज्याची टक्केवारी ८९.१४ ऐवढी आहे.
जिल्हानिहाय टक्के
जिल्हा टक्केवारी
भंडारा ८७.३२
चंद्रपूर ८७.५८
नागपूर ९३.४५
वर्धा ८७.४२
गडचिरोली ८१.५४
गोंदिया ९२.०४
.....................................
एकुण ८९.७९