नागपूर,
10th result : प्रबोधन कॉन्व्हेन्ट हायस्कूल व प्रबोधन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा उच्च माध्यमिक इयत्ता १२ व माध्यमिक परीक्षा इयत्ता १०वीचा निकाल १००टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करीत शाळा आणि महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे. विज्ञान शाखेतून
शुभम इंगळे तर वाणिज्य शाखेमध्ये दर्शन पांडे या विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यात विज्ञान शाखेत देवयानी रतकंठीवार, देवकी सोनी, दर्शिता सोनकुसरे, एकता अग्रवाल तर वाणिज्य शाखेत बेमारकर, प्रतीक्षा चौधरी, किर्ती तिवारी, अजित मिश्रा आदींचा समावेश आहे. तर दहावीत निवेदिता खोब्रागडे,आरुषी मेश्राम, अलंकृता देऊळकर, स्वर्णिक मस्के, अस्मा रेन या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळा व महाविद्यालयाचे उत्कृष्ट व्यवस्थापन,शिक्षकांचे वेळोवेळी मिळणारे अचूक मार्गदर्शन व पालकांना दिले आहे. महविद्यालयाच्या वतीने सर्व गुणवतांचे करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या विश्वस्त मीनाक्षी पाध्ये,संचालिका मनिषा पाध्ये,मुख्याध्यापिका अनुराधा श्रीरंग, सपना काळे,वैभव लक्षणे,सपना अंदनकर,पल्लवी थूठुरकर,मयुरी पारधी,कल्याणी काकडे,नेहा राजपाल,रुपाली ढोबळे,प्रीती नरसिकर उपस्थित होत्या.