वाशीम जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.४१ टक्के

13 May 2025 17:11:56
वाशीम, 
ssc Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज, १३ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला असून, वाशीम जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९५.४१ एवढी आहे. अमरावती विभागात दुसर्‍या स्थानी आहे. नेहमी प्रमाणे निकालात मुलापेक्षा मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यातील १०४ शाळांना निकाल १०० टक्के लागला आहे.
 
 

10th pass 
 
 
इयत्ता दहावी च्या परीक्षेसाठी वाशीम जिल्ह्यातून १९८५७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १९६९५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात एकूण १८७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १०४१२ विद्यार्थी तर ८३७९ मुलींचा समावेश आहे.ssc Result जाहीर झालेल्या निकालानानुसार ८७२२ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत, ६०९४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३३२८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६४६ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९ तर मुलींची ९७.१० टक्के आहे.
दहावीच्या निकालात रिसोड तालुका अव्वलस्थानी असून, त्याची टक्केवारी ९६.७५ एवढी आहे. वाशीम तालुका ९५.११ टक्के, मालेगाव तालुका ९५.५८ टक्के, कारंजा तालुका ९५.६५ टक्के, मंगरुळनाथ तालुका ९३.८९, मानोरा तालुका ९४.६८ टक्के निकाल लागला आहे. वाशीम तालुयातील २३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, कारंजा तालुका ३०, मालेगाव तालुका १०, रिसोड तालुका १८, मंगरुळनाथ तालुका १५ तर मानोरा तालुयातील ८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. निकाल पाहल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कही खुशी, कही गम असे चित्र पहावयास मिळाले.
 
----------------------
 
राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम
स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा एकूण निकाल ९४.७३ टक्के लागला आहे.
विशेष म्हणजे प्रथम क्रमांकावर ऋतुजा माधव गोटे आणि राणी विजय वाघ या दोन्ही विद्यार्थिनींनी ९५.६० टक्के इतके गुण प्राप्त केले आहेत आणि शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांकावर भक्ती राजेश थेर या विद्यार्थिनीने ९४.८० टक्के गुण मिळविले आहे तसेच संचिता नारायण गोटे हिने ९४.४० टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेतून विशेष प्राविण्य प्राप्त ६० च्या वर विद्यार्थिनी आहेत. तर मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी केशव गोटे हिने ७३.८० टक्के गुण मिळविले आहेत. विद्यार्थिनींनी मिळवलेले भरघोस यश पाहून संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकरराव अनसिंगकर, सचिव डॉ. प्रदीप फाटक, सहसचिव डॉ. सुनिता घुडे सदस्या विजया देशपांडे आणि संध्याताई देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता गिरी आणि उपमुख्याध्यापक राजेश ढाकरके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनिंना सुयोग्य मार्गदर्शन लाभले तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
 
 

10th pass 
 
एसएमसी इंग्लिश स्कूल चा १०० टक्के निकाल
५३ वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षण देण्यासाठी सुरु झालेले छोटेसे रोपटे एसएमसी इंग्लिश स्कूल च्या भव्य इमारतीच्या वटवृक्षाच्या स्वरुपात डौलाने, उत्तुंग रुपात उभे आहे. हे कोणाच्याही नजरेतून सुटू शकत नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही एस एम सी इंग्लिश स्कूल च्या इतिहासात १० व्या वर्गाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
 
 

vashim SSC 
 
 
२०२४-२५ च्या १० व्या वर्गाच्या परीक्षेला एसएमसी इंग्लिश स्कूल चे एकूण ६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ९० टक्केच्या वर १४ विद्यार्थी, विशेष प्राविण्यासह ३४ विद्यार्थी तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अर्जुन पवनकुमार खंडेलवाल या विद्यार्थ्याने ९५.६० टक्के घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. श्रेया संतोष पिसे, ऋतिका विशाल वाल्ले ९५.४० टक्के घेऊन द्वितीय तर सौम्या राजेश ग्यारल ९५.२० टक्के ही विद्यार्थीनी शाळे मधून तिसरी आली आहे. त्याचबरोबर ३२ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात विशेष प्राविण्यासह, ३१ विद्यार्थी मराठी विषयात विशेष प्राविण्यासह, ५२ विद्यार्थी हिंदी-संस्कृत विषयात विशेष प्राविण्यासह, ४४ विद्यार्थी गणित विषयात विशेष प्राविण्यासह, ५१ विद्यार्थी विज्ञान विषयात विशेष प्राविण्यासह आणि ४५ विद्यार्थी सामाजिक शास्त्र विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर आणि सचिव पुरुषोत्तमजी शर्मा सर्व संचालक आणि मुख्याध्यापिका मीना उबगडे, प्रणिता हरसुले यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0