पालघर,
Palghar Couple dies in Philippines महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील एका जोडप्याचा फिलीपिन्समध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी सेंट थॉमस चर्चच्या मुख्य पुजाऱ्याने या घटनेची माहिती दिली.
ही घटना १० मे रोजी घडली, जेव्हा ५० वर्षीय जेराल्ड परेरा आणि त्यांची पत्नी प्रिया (४६) हे दुचाकीवरून फिलीपिन्समधील बॅडियन येथे जात असताना एका वेगवान ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर हे जोडपे विजेच्या खांबावर आदळले. Palghar Couple dies in Philippines या अपघातात प्रियाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत जेराल्डला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.