महालक्ष्मी मंदिरात संस्कार शिबिराचा समारोप

    दिनांक :14-May-2025
Total Views |
नागपूर,
Jayaprakash Nagar Nagpur जयप्रकाश नगर महालक्ष्मी मंदिरात १०दिवसीय संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला. शिबिराचे उदघाटन तपोवन येथील सामाजिक कार्यकर्त्या .उज्वला कुलकर्णी यांनी केले होते. .महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त, अध्यक्ष बाबासाहेब पाटील,नगर सेवा प्रमुख किशोर वैद्य, मंचावर उपस्थित होते.संस्कार वर्गाला एकूण ६० मुले,मुली उपस्थित असायचे.शिबिरात रोज प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर गीत,श्लोक,विविध प्रकारचे खेळ,योगासन, सूर्य नमस्कार,ओंकार इ.कार्यक्रम होत असत. चित्रकला,हस्तकला, पेंटिंग त्यांना शिकविण्यात आले होते. मुलांना बचतीचे महत्व सांगण्याकरिता धरमपेठ अर्बन महिला मल्टी स्टेट सोसायटीचे खामला शाखेचे प्रबंधक अक्षय घुई यांनी गोष्टीरूपात बचतीचे महत्व मुलांना समजावून सांगितले.जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते विनोद संगीतराव, संजय डबली व श्रावण पराते यांनी मुलांना रहदारी व वाहतुकीचे नियम याबाबत जागरूक केले.नगर शारीरिक प्रमुख .अक्षय देव यांनी देशभक्तीपर गीतांची संथा दिली.हे संस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षिका श्वेता गर्गे,स्नेहल आबदेव ,सुनीता लुले , वैशाली भांगे, संध्या अल्करी मीराआळशी यांनी खूप परिश्रम घेतलेत.दररोज मुलांना अल्पोपहाराची व्यवस्था प्रभात शाखेच्या सहभागाने विजय आळशी व दीपक शेंबेकर यांनी उत्तमपणे सांभाळली.
 
 
 
dani
 
 
संस्कार शिबिराच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक सिद्धहस्त लेखक,सर्वेश फडणवीस,,अध्यक्ष ,भाग सेवा प्रमुख अनिरुद्ध जोशी व,मंदिर विश्वस्त प्रकाश खोत हे मंचावर उपस्थित होते.विशेष उपस्थितीत नगर संघचालक अरविंद भुमराळकर वकुटूंब प्रबोधन, संयोजक, नितीन मोहरील,यांची उपस्थिती लाभली. Jayaprakash Nagar Nagpur या समारोपाच्या प्रसंगी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ.हेडगेवार, स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर, व तारामती इ.व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्यात.प्रमुख पाहुण्यांनी परमवीरचक्र विजेता विक्रम बत्रा यांची गोष्ट सांगून इथे झालेले संस्कार रोजच्या दिनचर्येत आणून एक सक्षम नागरिक होण्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले..संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शिबिरार्थी.निधी गणोरकरने केले.आभार प्रदर्शन मीरा आळशी यांनी केले.
 
सौजन्य:विजय दाणी ,संपर्क मित्र