लाचखोर हवालदारावर गुन्हा दाखल

लाखनी पोलिस ठाण्यात कारवाई

    दिनांक :14-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा,
Lakhni Police Station स्वतः चा घराचा ताबा मिळण्याकरिता लाखनी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत सहकार्य करण्यासाठी हवालदाराने तक्रारदार यांना 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचा पहिला हफ्ता म्हणून 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या हवालदाराला लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपी पोलिस हवालदार राजेश निलकंठ भजने (49) रा. समर्थ नगर लाखनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घरझडतीची कारवाई करण्यात आली.
 
 
Lakhni Police
 
 
तक्रारदार यांनी सन 2018 मध्ये लाखनी, भंडारा येथे एक घर खरेदी केले होते व ते नागपूर मधील त्यांच्या गावी राहण्यास गेले होते. 17 एप्रिल रोजी एक महिला व तिचा मुलगा यांनी त्यांचे भंडारा येथील सदर घराचे कुलूप तोडून त्याचा ताबा घेतला. याबाबत तक्रारदार यांनी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. Lakhni Police Station या संदर्भात महिला व तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात सहकार्य करून नमूद महिला व तिच्या मुलास घरातून बाहेर काढून सदर घराचा ताबा तक्रारदार यांना देण्याकरिता आरोपी पोलिस हवालदार राजेश निलकंठ भजने (49) रा. समर्थ नगर लाखनी यांनी तक्रारदारास 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याचा पहिला हफ्ता 5 हजार रुपये लाच म्हणून मागितला. याविषयी ला. प्र. वि भंडारा येथे तक्रार करण्यात आली. पडताळणीअंती लाखनी पोलिस ठाण्यात शासकीय पंचासह कारवाईचे नियोजन केले असता आरोपी हवालदाराला संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र त्याने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याने राजेश नीलकंठराव भजने यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलिस स्टेशन लाखनी, येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
सदर कारवाई ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलिस निरीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या पथकाने केली. Lakhni Police Station यामध्ये पोलिस उप निरीक्षक संजय कुंजरकर, हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, शिलपेंद्र मेश्राम, पोलिस नायक अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे, शिपाई विष्णू वरठे, चेतन पोटे, मयूर सिंगणजूडे, विवेक रणदिवे, राहूल राऊत यांचा समावेश आहे.