नागपूर,
School of Deaf and Dumb मूक आणि बधिर औद्योगिक संस्थेद्वारे संचालित मुक बधिर विद्यालय शंकरनगरचा निकाल जाहीर झाला. जाहीर झालेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात आमच्या शाळेचा ९९% निकाल लागला. आपल्या श्रवणदोषावर मात करीत येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. निकालात प्रीती बंडू भड या विद्यार्थ्यांनीने ६७% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला त्याचप्रमाणे हिमांशु काटेखाये यांनी ६५.३३%, दीक्षिता बोबडे या विद्यार्थिनीने ६४.४०% घेऊन दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेत.
महाविद्यालयाचा ९९% निकाल लागला. एकूण ७२ विद्यार्थी यावर्षी मंडळाच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेली होती ती सर्व मुले चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालीत. आपल्या यशाचे सर्व श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका मीनल सांगोळे यांना तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांना देत आहेत. एकूण ३२ मुली आणि ४० मुले यावर्षी परीक्षेस प्रविष्ठ झाली होती.१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि इतर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालीत.
सौजन्य: प्रवीण घुले, संपर्क मित्र