करिअर कट्टा आणि महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

15 May 2025 16:37:19
नागपूर,
Mr. Binzani City College महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि श्री. बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागातील ४० हून अधिक महाविद्यालयांचा करिअर कट्टा आणि संबंधित महाविद्यालयांमध्ये होणारा सामंजस्य करार नुकताच श्री. बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त) नागपूर येथे संपन्न झालेला आहे.कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय प्राचार्य प्रवर्तक, प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे, प्राचार्य प्रवर्तक डॉ. सुजित मेत्रे,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे यशवंत शितोळे,विभागीय समन्वयक प्रा. डॉ.नरेंद्र रघटाटे,सहविभागीय समन्वयक,प्रा. वर्षा वैद्य, सहविभागीय समन्वयक, डॉ .उपेंद्र बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुजित मेत्रे यांनी केले प्रास्ताविकपर मनोगतातून उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयीन समन्वयक यांना सामंजस्य करारा संदर्भातील उद्दिष्टांबद्दल आणि वैशिष्ट्यांबद्दल विस्तृत माहिती दिली. यशवंत शितोळे यांनी आतापर्यंत करिअर कट्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांविषयी सांगताना पुढे भविष्यात करिअर कट्टाच्या वतीने घेण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी सखोल माहिती दिली.

sayali 
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. शरयू तायवडे यांनी मांडले. संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यगण आणि महाविद्यालयीन समन्वयक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.Mr. Binzani City Collegeकार्यक्रमा दरम्यान उपस्थिततांना नवीन शैक्षणिक क्षेत्रासाठी करिअर कट्टा माहिती पुस्तिका २०२५- २०२६ आणि करियर संसद मार्गदर्शन पुस्तिका याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. श्रीराम फरताडे यांनी केले.कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्राचार्यगण, महाविद्यालयीन समन्वयक, जिल्हा समन्वयक आणि तालुका समन्वयक यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
सौजन्य:प्रा.सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0