परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

    दिनांक :15-May-2025
Total Views |
नागपूर,
Parashar Brahmin Mandal पाराशर ब्राह्मण हितसंवर्धक बहुउद्देशीय संस्था व पाराशर ब्राह्मण मंडळ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम दीप प्रज्वलन व भगवान परशुरामांचा वेद मत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर संजय चिंचाळे, अरविंद पाठक, प्रदिप रहिसे, प्रविण गोधे यांची उपस्थिती होती. यावेळी संजय चिंचोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकीचे महत्त्व सांगून समाज एकत्र झाला तरच, समाजाचा विकास साध्य असल्याचे सांगितले.
 

arvind  
 
 
प्रविण गोधे यांनी भगवान परशुराम यांची महत्ता सांगून भगवान परशुरामांचा आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करून सर्वांनी आपल्या धर्माचा गौरव करून धर्म कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.Parashar Brahmin Mandal यावेळी पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बांधव व त्यानंतर झालेल्या युद्धादरम्यान शहिद झालेल्या जवानांना उपस्थितांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी समाज बंधू-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले.
सौजन्य:अरविंद पाठक, संपर्क मित्र