शिक्षकांना संपकाळातील वेतन द्या

15 May 2025 17:59:22
गोंदिया, 
Teachers strike शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ऑगस्ट 2018 मध्ये राज्यव्यापी संप पुकारला होता. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे संपकाळातील वेतन कपात करण्यात आले. संपकालीन रजा असाधारण रजा ग्राह्य धरण्यात आल्या. असे असतानाही जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन देण्यात आले नाही. संपकाळील वेतन द्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्यांची पुर्तता करावी, चर्चेसाठी सचिव स्तरीय सभा आयोजित करावी, अशी मागणी शिक्षक समितीने आमदार विनोद अग्रवाल यांचे नेतृत्वात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सभा आयोजित करण्याची ग्वाही ना. गोरे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
 

टीचर्स पेय  
 
 
शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आ. विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेत संपकालीन वेतन अदा करण्यात यावे, असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा मंजूर करण्यात याव्यात, मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक कालावधी एक वर्षाचा करून किमान मानधन 40 हजार रुपये करावे, पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी, मुख्यालयाची अट शिथिल करावी, 10:20:30 ची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, पीएमश्री शाळेत कार्यरत शिक्षकांच्या धरतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत कार्यरत शिक्षकांना बदलीत सूट द्यावी, अप्रशिक्षित शिक्षकांचा अप्रशिक्षित कालावधी सेवाविषयक लाभासाठी ग्राह धरावा, 24 वर्षानंतर निवड श्रेणीचा सरसकट लाभ प्रदान करावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांची सेवा जेष्ठता ग्राह्य धरून तत्काळ नेमणूक करावी, आदी मागण्यांवर चर्चा करून ना. जयकुमार गोरे यांना यांना निवेदन देण्यात आले.Teachers strike सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत तत्काळ नस्ती सादर करण्याचे निर्देश ना. गोरे यांंनी संबंधितांना दिले. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना संपकाळातील तीन दिवसांचा वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. शिष्टमंडळ समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा प्रतिनिधी उमेश रहांगडाले, कृती समिती समन्वयक एस. यू. वंजारी उपस्थित होते.
Title
ऑगस्ट 2018 मध्ये पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातीलच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आला आहे. कपात वेतन मिळण्यासाठी शिक्षक समितीच्या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपकालीन वेतन अदा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून कार्यवाही करण्याची मागणी करणार आहे.
आ. विनोद अग्रवाल, गोंदिया
Powered By Sangraha 9.0