देवळी,
Rajesh Bakane महावितरणतर्फे लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू असून या अंतर्गत भाग्यवान विजेत्याला मोबाईल फोन, स्मार्ट वॉच बक्षीस स्वरूपात दिले जाते. सलग तीन महिने ऑनलाईन पेमेंट द्वारे वीज बिल भरणा करणार्या ग्राहकांसाठी ही योजना असून ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करावे यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजा अभियान सध्या तालुयात जोरात सुरू आहे.
आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आ. राजेश बकाने प्रत्येक पंचायत समिती गणात हे अभियान राबवित आहे. या अभियानातच महावितरणच्या भाग्यवान ग्राहकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. Rajesh Bakane नांदुरा डफरे येथे राबविण्यात आलेल्या अभियानात शालिक शेळके आणि तुळशीराम तराळे यांना आ. राजेश बकाने यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले. या अभियानात उपस्थित सर्व नागरिकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची माहिती देण्यात आली. सोलर मुळे वीज ग्राहकांना शुन्य रुपये वीज बिल येणार आहे.
या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रेम कुमार तेलरांधे, सहाय्यक अभियंता जॉन कोशे, प्रधान तंत्रज्ञ दिनेश परचाके, सहाय्यक अभियंता शरद ईळपाथे, तहसिलदार समर्थ क्षीरसागर, गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे, नायब तहसिलदार अर्जुन देवकर, राहुल चोपडा, स्वप्निल खडसे, निलेश कसणारे, संजय बिजवार, राजू इंगोले, किशोर गवाळकर, विशाल मुडे आदी उपस्थित होते.