उन्हाळ्यात 'हे' फुटवेअर ट्रेंडमध्ये

फॅशन आणि कम्फर्टला प्राधान्य

    दिनांक :17-May-2025
Total Views |
Footwear उन्हाळ्याच्या कडक उन्हात केवळ कपड्यांचीच नव्हे, तर पावलांवरील फुटवेअरची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. यंदाच्या उन्हाळ्यात फॅशनच्या दुनियेत काही खास फुटवेअर प्रकारांची चलती पाहायला मिळत आहे. स्टाईल आणि कम्फर्टचा योग्य मेळ साधणाऱ्या या ट्रेंडनी तरुणाईला आकर्षित केले आहे.फॅशनेबल दिसणं महत्त्वाचं असलं, तरी दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी योग्य फुटवेअरची निवड अत्यावश्यक ठरते. चुकीच्या पद्धतीच्या चपला, बूट किंवा सँडलमुळे पायांमध्ये वेदना, पंजातील बिघाड, गुडघ्यांचे त्रास आणि पाठीचा ताण निर्माण होतो. त्यामुळे ‘स्टाईलपेक्षा हेल्थ’ हे धोरण पाळून आरोग्यासाठी उपयुक्त फुटवेअरची निवड करणं गरजेचं आहे.
 
 

Footwear 
फुटवेअरची योग्य निवड म्हणजेच दीर्घकालीन आरोग्याचा पाया
 
 
फॅशनच्या नादात आरोग्याचा विचार न करता चपला खरेदी केल्या जातात. मात्र, योग्य फुटवेअरमुळे फक्त पाय नव्हे, तर गुडघे, कंबर आणि मणक्यालाही आधार मिळतो. त्यामुळे 'आरामदायक चपला म्हणजे फक्त ज्येष्ठांसाठी' हा गैरसमज दूर करून प्रत्येक वयोगट
 
 
1. स्लायडर्स आणि फ्लॅट्सचा जलवा
हवेशीर, सहज घालता येणारे आणि स्टायलिश असे स्लायडर्स तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. विविध रंग, डिझाईन्स आणि ब्रँड्समध्ये उपलब्ध असलेले हे फ्लॅट फुटवेअर कॉलेज युवतींपासून ऑफिसगोईंग महिलांपर्यंत सगळ्यांची पसंती मिळवत आहेत.
 
 
2. स्पोर्ट्स सॅंडल्स – अ‍ॅक्टिव्ह लुकसाठी हिट 
दैनंदिन वापरासाठी आरामदायक आणि टिकाऊ पर्याय म्हणून स्पोर्ट्स सॅंडल्सना पसंती दिली जात आहे. खासकरून बाहेर फिरणाऱ्या तरुणांमध्ये त्यांची मागणी वाढली आहे.
 
 
3. कोल्हापुरी चप्पल्स – पारंपरिक लुकला मॉडर्न टच
कोल्हापुरी चप्पल्स पुन्हा एकदा फॅशनमध्ये परतल्या आहेत. हलक्याफुलक्या कापडी कुर्त्यांबरोबर या चप्पल्स फारच खुलून दिसतात. यामध्ये रंगीबेरंगी धाग्यांनी सजवलेले मॉडर्न डिझाइन्स सध्या हिट आहेत.
 
 
4. व्हाइट स्नीकर्स – ऑल टाइम फॅशन स्टेटमेंट
अगदी साडीपासून जीन्सपर्यंत कोणत्याही आउटफिटवर शोभून दिसणारे व्हाइट स्नीकर्स हे यंदाच्या उन्हाळ्यातील ‘मस्ट हॅव’ फुटवेअर ठरले आहेत. मुलींच्या फॅशनमध्ये याने वेगळीच क्रांती घडवली आहे.
 
 
5. रफ अँड टफ चप्पल्स – ट्रॅव्हलर्ससाठी खास
ट्रेकिंगला जाणाऱ्यांपासून लॉन्ग वॉक करणाऱ्यांसाठी रफ अँड टफ चप्पल्स हे बेस्ट ऑप्शन मानले जात आहे. त्यातील अँटी-स्लिप आणि वॉटर रेसिस्टंट फीचर्समुळे यांची लोकप्रियता वाढली आहे.
 
 
 
... तर आरोयसाठी उपयुक्त
 
1. ऑर्थोपेडिक चप्पल्स – पाठीचा त्रास टाळण्यासाठी लाभदायक
कम्फर्टेबल सोल्स, योग्य आर्च सपोर्ट आणि शॉक अ‍ॅब्जॉर्बिंग तळव्यासह येणाऱ्या ऑर्थोपेडिक चप्पल्स मध्यमवयीन आणि ज्येष्ठांसाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः लांब वेळ उभं राहणाऱ्यांना याचा उपयोग होतो.
 
2. अ‍ॅनाटॉमिक सोल्स असलेले फुटवेअर
ज्याच्या सोलची रचना पायाच्या नैसर्गिक वाकड्यांनुसार केली जाते, अशा फुटवेअरमध्ये चालताना ताण कमी होतो. हाय आर्च किंवा फ्लॅट फुट असणाऱ्यांसाठी हे आदर्श ठरते.
 
 
3. मेमरी फोम इनसोल शूज – सतत चालणाऱ्यांसाठी वरदान
मेमरी फोम शूज हे पायाच्या शेपप्रमाणे सोलला आकार देतात आणि चालताना झालेल्या दडपणाचा परिणाम कमी करतात. धावपळीच्या जीवनशैलीत हे शूज आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतात.
 
 
4. ओपन-टो सँडल्स – त्वचेला श्वास घेण्यासाठी मोकळीक
उन्हाळ्यात ओपन-टो सँडल्समुळे पायाला हवा मिळते आणि घामामुळे होणाऱ्या संसर्गांचा धोका कमी होतो. विशेषतः डायबेटिक रुग्णांसाठी अशा प्रकारचे सँडल्स सुरक्षित मानले जातात.
 
 
5. अँटी-स्लिप आणि शॉक अ‍ॅब्जॉर्बिंग चप्पल्स
घरात वापरण्यासाठी सॉफ्ट, ग्रीप असलेल्या आणि अ‍ॅन्टी-स्लिप बेस असलेल्या चप्पल्स निवडाव्यात. यामुळे वयोवृद्ध किंवा लहान मुलांमध्ये घसरून पडण्याचा धोका कमी होतो.