पुणे,
Vaishnavi Shashank Hagwane suicide राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील राजेंद्र हगवणे यांची सुन वैष्णवी शशांक हगवणे हिने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारी साडे चारच्या सुमारास मुळशी तालुक्यातील भुकूम येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाचच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केली. काही वेळानंतर पती शशांक हगवणे याने दरवाजा ठोठावला. पत्नीने दरवाजा न उघडल्याने शशांक यानी दरवाजा तोडला. त्यानंतर ही गंभीर घटना समोर आली. शशांक यानी तातडीने पत्नीला खासगी रुग्णालयात नेले. आधी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैष्णवीला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. Vaishnavi Shashank Hagwane suicide वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे काही व्रण आढळले आहेत. याप्रकरणी बावधन पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध बावधन पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू, नणंद यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला नऊ महिन्याचा मुलगा आहे.