मिथुन चक्रवर्ती यांना बीएमसीकडून कायदेशीर नोटीस

18 May 2025 13:09:23
मुंबई
Mithun Chakraborty प्रसिद्ध अभिनेता आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली आहे. मालाडमधील एरंगल गावात त्यांच्या मालकीच्या भूखंडावर परवानगीशिवाय बांधकाम केल्याची तक्रार असून, बीएमसीने दिलेल्या नोटीसीनुसार समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित बांधकाम पाडले जाणार आहे.
 
 
 

Mithun Chakraborty 
भूखंडाचाही समावेश
 
 
१० मे रोजी Mithun Chakraborty बीएमसीने शहरातील बेकायदेशीर बांधकामांची यादी तयार केली. यामध्ये मालाड येथील हीरा देवी मंदिराजवळील भूखंडाचाही समावेश आहे. या जागेवर ग्राउंड प्लस मेझानाइन फ्लोअर असलेले दोन स्ट्रक्चर्स, ग्राउंड फ्लोअरवरील एक स्ट्रक्चर आणि १० बाय १० फूटाचे तीन तात्पुरते युनिट्स उभारण्यात आले आहेत. या युनिट्समध्ये विटा, लाकडी फळ्या, काचेच्या भिंती आणि एसी शीट्स वापरण्यात आल्या असून, यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही, असे बीएमसीचे म्हणणे आहे.या प्रकरणी प्रतिक्रिया देताना मिथुन चक्रवर्ती यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. "मी कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही आणि माझ्याकडे कोणतीही अनधिकृत मालमत्ता नाही. अनेक लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमचे उत्तर पाठवत आहोत," असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
Powered By Sangraha 9.0