अभिनेत्री करत होती विचित्र काम मग झाली अटक

18 May 2025 16:46:16
ढाका,
Nusrat Faria बांगलादेशातील गाजलेली अभिनेत्री नुसरत फारिया हिला हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. थायलंडला जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला अडवण्यात आले. विरोधकांवर कारवाईचा सपाटा सुरू असलेल्या कार्यकारी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
 

Nusrat Faria Arrest 
प्राथमिक वृत्तानुसार, फारियाविरोधात बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यामुळेच तिला रविवारी सकाळी विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
 
 
फारियावर नेमका आरोप काय?
 
 
२९ Nusrat Faria एप्रिल रोजी बांगलादेशात झालेल्या जुलै उठावाशी संबंधित प्रकरणात फारिया आणि इतर काही कलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात हत्येच्या प्रयत्नाचाही समावेश आहे.नुसरत फारियाने २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन' या चित्रपटात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे भारत आणि बांगलादेश यांच्यात संयुक्त निर्मिती झाली होती.अटक केल्यानंतर फारियाला ढाक्यातील वातारा पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यानंतर तिला ढाका महानगर पोलिसांच्या गुप्तहेर शाखेकडे सोपवण्यात आल्याची माहिती बड्डा झोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी दिली आहे.
बांगलादेश सरकारकडून सध्या विरोधकांवर व त्यांच्या समर्थकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत एका अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या प्रकारामुळे व्यापक चर्चा रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0