नागपूर,
Shivraj Singh Chouhan : आयसीएआरचे 16 हजार कृषी वैज्ञानिक कृषी विस्तार अधिकाèयांसह 29 मे ते 12 जून खरीप हंगामाच्या नियोजनासाठी गावांना भेटी देत शेतकèयांना शाश्वत शेती, नवीन प्रकारचे बियाणे, नवोपक्रमांबद्दल शिक्षित करतील, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमास कृषी मंत्री अॅड. माणिक कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री अॅड . आशीष जयस्वाल, खा. श्याम बर्वे, आ. आशीष देशमुख, आ. चरणसिंह ठाकूर, कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू नितीन पाटील, कृषी आयुक्त सूरज मांडरे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. एम. एल. जाट आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात जलसंधारणाची जी कामे केली त्याला तोड नाही. जलयुक्त शिवार महाराष्ट्राला वरदान ठरले. संयम, धैर्य व निश्चयी वृत्तीने त्यांची कार्यशैली कोणत्याही आव्हानात डगमगली नाही’, या शब्दात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला.
‘एक राष्ट्र एक शेती व एक संघ’ हे तत्व साकार होणार असून कृषी समृद्धीच्या संदर्भात केंद्र सरकार राज्य शासनासोबत कार्यरत राहील, अशी ग्वाही शिवराजसिंह चौहान यांनी दिली. आयसीएआरच्या देशभरात 113 संस्थांच्या प्रमुखांसोबत नागपुरातील मृदा सर्वेक्षण संस्थेत बैठक घेणार असून महाराष्ट्रातील कृषी विकासाची दिशा साध्य होणार आहे. उत्पादन वाढीसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे, माती परीक्षण व उत्पादन खर्चात कपात ही त्रिसूत्री शेतकèयांनी समजून घ्यावी. शुद्ध व रोगमुक्त रोपवाटिकेसाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम राबविला जात आहे.
इतर मान्यवरांची भाषणे झाली. नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, शेतकरी उत्पादक संघात उल्लेखनीय कार्य करणाèया शेतकèयांचा सत्कार करण्यात आला.
शेतकèयांना दिवसाचे 12 तास स्वच्छ वीज
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली असून यातून 16 हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली. यातील 4 हजार मॅगावॅटची निर्मिती पूर्णत्वास आली. 2026 च्या अखेरपर्यंत दिवसाचे 12 तास वीज देण्यासह राज्यात 12 महिने विजेची उपलब्धता करू, असा विश्वस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नॅशनल सॉईल स्पेक्ट्रम स्पेक्ट्रल लायब्ररीचे उद््घाटन झाले. महाराष्ट्र मृदा नकाशा असलेले पहिले राज्य बनले आहे. कापसाच्या पिकांवर पडणाèया गुलाबी बोंड अळीच्या कीड व्यवस्थापनासाठी एआय आधारित स्मार्ट ट्रॅप तंत्रज्ञानाचा प्रारंभ करण्यात आला. हे तंत्र शेतकèयांना संक्रमित पिकांबद्दल अलर्ट पाठवेल.