पुलगाव,
Tricolor Honorary Visit पहलगामच्या घटनेनंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून शत्रुराष्ट्राच्या नांग्या ठेचल्या. या भारतीय सैनिकांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी व त्यांना नमन करण्यासाठी पुलगाव शहरांमध्ये आज रविवार १८ रोजी सकाळी ११ वाजता तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली.
हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम व भारतीय सैनिकांचा जयघोष करणार्या घोषणा देत ही तिरंगा सन्मान यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून फिरून टिळक चौक येथे समारोप करण्यात आला. या तिरंगा सन्मान यात्रेमध्ये आमदार राजेश बकाने सहभागी झाले होते. Tricolor Honorary Visit यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील गणमान्य नागरिक सहभागी झाले होते. मार्गामध्ये आमदार राजेश बकाने यांनी आदर्श भगतसिंग यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी पुष्पमाला अर्पण केली.