तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Chandrapur's temperature मे महिन्याच्या सुरूवातीला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात घट झाली होती. मात्र, पंधरवाडा लोटताच जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली असून, सोमवार, 19 एप्रिल रोजी ब्रम्हपुरीत विदर्भातील सर्वाधिक 42.6, तर त्या पाठोपाठ चंद्रपुरात 41.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमान वेगाने वाढ झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वतावरण निर्माण झाले. अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर काही तालुक्यात गारपीटही झाले. त्यामुळे तापमानाचा चढलेला पारा खाली उतरला होता. मात्र, आता उष्णतेत वाढ जाणवू लागली आहे. Chandrapur's temperature सोमवारी चंद्रपूर जिल्हा अगे्रसर होता. त्यापाठोपाठ नागपूरचे तामपान 41, अकोला 40.8, अमरावती 40.4, भंडारा व वर्धा 40, गडचिरोली 39.6, गोंदिया 39.4, यवतमाळ 39, वाशिम 37.5, बुलढाण्यात 35.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.