बॉलिवूड अभिनेत्री कोविड पॉझिटिव्ह!

19 May 2025 14:48:10
 
शिल्पा शिरोडकर
 
मुंबई
Corona Positive बिग बॉस १८ या रिॲलिटी शोमध्ये दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या तब्येतीबद्दल चाहत्यांसोबत एक अपडेट शेअर केला. तिने सांगितले की तिला कोराना झाला आहे. अभिनेत्रीची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी, तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती शेअर केली आणि चाहत्यांना सतर्क आणि सावध राहण्यास सांगितले. अभिनेत्रीची पोस्ट येताच व्हायरल झाली आहे आणि तिचे चाहते आणि जवळचे मित्र तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
Powered By Sangraha 9.0